Home » क्रीडा » T20 World Cup : झहीर खानने केलं टीम इंडियाला सावध, सांगितला न्यूझीलंडचा 'धोका'

T20 World Cup : झहीर खानने केलं टीम इंडियाला सावध, सांगितला न्यूझीलंडचा 'धोका'

t20-world-cup-:-झहीर-खानने-केलं-टीम-इंडियाला-सावध,-सांगितला-न्यूझीलंडचा-'धोका'

टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा (India vs Pakistan) पराभव केला, यानंतर पाकिस्तानने मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडलाही (Pakistan vs New Zealand) पराभवाची धूळ चारली.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 27 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाचा (India vs Pakistan) पराभव केला, यानंतर पाकिस्तानने मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडलाही (Pakistan vs New Zealand) पराभवाची धूळ चारली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये दिग्गज टीमविरुद्ध विजय मिळवल्यामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या टीमसाठी भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते, त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रविवारी 31 ऑक्टोबरला होणारा सामना दोन्ही टीमसाठी करो या मरोचा ठरू शकतो. या सामन्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानने (Zaheer Khan) टीम इंडियाला सावध केलं आहे. ‘न्यूझीलंडची टीम प्रत्येक मॅच जिंकू इच्छिते आणि त्यांच्यामध्ये भरपूर जोश आहे. पाकिस्तानविरुद्ध त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी जी लढत दिली ती शानदार होती. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये जास्त रन केल्या नाहीत, पण त्यांनी बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये जी कामगिरी केली ती पाहिली तर त्यांनी अखेरपर्यंत मॅच सोडली नव्हती, असं म्हणावं लागेल. भारताला यापासून सावध राहावं लागेल,’ असं झहीर म्हणाला. ‘खराब सुरुवातीनंतर जर भारत आपल्या क्षमतेनुसार खेळला तर तो जगातल्या कोणत्याही टीमला हरवू शकतो. कोणतीही टीम त्यांच्यासमोर उभी राहू शकत नाही. कोणत्याही टीमला विजयाची लय लवकरात लवकर मिळवणं महत्त्वाचं असतं, खासकरून वर्ल्ड कपमध्ये. यावेळी भारताने पहिली मॅच गमावली, त्यामुळे आता टीमला फार उशीर होणार नाही हे निश्चित करावं लागेल,’ असा इशाराही झहीरने दिला. पाकिस्तानचे उरलेले सामने आता अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध आहेत. भारत आणि न्यूझीलंडची तुलना केली तर या तिन्ही टीम दुबळ्या आहेत. या ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये टॉप-2 च्या टीम जाणार आहेत, त्यामुळे पाकिस्तानचं सेमी फायनलमध्ये पोहोचणं जवळपास निश्चित आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये 31 ऑक्टोबरला होणारी मॅच व्हर्चुअल क्वार्टर फायनल ठरू शकते. दुबईच्या मैदानात संध्याकाळी 7.30 वाजता या मॅचला सुरूवात होईल.

  Published by:Shreyas

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published.