Home » Uncategorized » म्हणून Washington Sundar ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून नाव घेतले मागे

म्हणून Washington Sundar ने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून नाव घेतले मागे

म्हणून-washington-sundar-ने-सय्यद-मुश्ताक-अली-ट्रॉफीतून-नाव-घेतले-मागे

Washington Sundar

लवकरच सय्यद मुश्ताक अली 2021-2022 स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पण, तामिळनाडू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने(Washington Sundar ) ही स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: नुकतंच आयपीएल 2021 (IPL2021)चा 14 सीझन पार पडला. त्यानंतर आता लवकरच सय्यद मुश्ताक अली 2021-2022 स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तामिळनाडू संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar ) ही स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे. त्याने नॅशनल क्रिकेट ॲकेडमीचे (NCA) संचालक राहुल द्रविड यांच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच सय्यद मुश्ताक अली 2021-2022 स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी, वॉशिंग्टन सुंदरने जायबंदी झाल्याच्या कारणास्तव संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू संघाचे नेतृत्व विजय शंकरच्या हाती देण्यात आले आहे. तर संघातील वरिष्ठ खेळाडू दिनेश कार्तिकने देखील या स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे. वॉशिंग्टनला बोटाला दुखापत झाली आहे, त्यामुळे राहुल द्रविडने त्याला आणखी चार आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. परंतु, गोलंदाजी करताना त्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. असे एनसीएच्या वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे. तर तमिळनाडु क्रिकेट असोसिएशनचे सचिव एस रामास्वामी यांनी सुंदरसंदर्भात माहिती देताना “तो अजूनही पूर्णपणे ठीक झाला नाहीये. त्याची तर्जनी अजुनपर्यंत पूर्णपणे ठीक झाली नाहीये. तो फलंदाज म्हणून तर खेळू शकतो. परंतु, त्याच्या दुखापतीत आणखी वाढ होऊ शकते. असे म्हटले आहे. अष्टपैलू विजय शंकर जखमी दिनेश कार्तिकच्या जागी आगामी सय्यद मुश्ताक अली टी -20 स्पर्धेत तामिळनाडूचे नेतृत्व करणार आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (TNCA) सोमवारी ही घोषणा केली आहे.

  Published by:Dhanshri Otari

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  You may have missed