Home » Uncategorized » INDvsPAk मॅच रद्द होण्याच्या मागणीवर दिग्गज बॅडमिंटनपटू म्हणाले…

INDvsPAk मॅच रद्द होण्याच्या मागणीवर दिग्गज बॅडमिंटनपटू म्हणाले…

indvspak-मॅच-रद्द-होण्याच्या-मागणीवर-दिग्गज-बॅडमिंटनपटू-म्हणाले…

INDvsPAk मॅच रद्द होण्याच्या मागणीवर दिग्गज बॅडमिंटनपटू म्हणाले…

जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashmir Terrorist Attack) हल्ले बघता टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान होणारा मुकाबला रद्द करावा, अशी मागणीवर जोर धरला आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेले दहशतवादी (Jammu Kashmir Terrorist Attack) हल्ले बघता टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) रविवार 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान होणारा मुकाबला रद्द करावा, अशी मागणीवे जोर धरला आहे. मात्र, बीसीसीआयने आयसीसी नियमाअंतर्गत हा सामना रद्द होऊ शकत नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण(prakash padukone) यांनी आपले मत मांडले आहे. ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ च्या एका कार्यक्रमाच्या आयोजनात ते बोलत होते. भारत आणि पाकिस्तान होणारा सामना रद्द करण्यात यावा या सुरु असलेल्या मागणीवर त्यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, माझ्या मते खेळ आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे, खेळ राजकारणात मिसळू नये आणि या सामन्याने पुढे जायला हवे. हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ते घडते की नाही यावर मला टिप्पणी करण्याचा अधिकार नाही. तसेच ते पुढे म्हणाले, सामन्याचे आयोजन हे झाले पाहिजे. ते यापूर्वी अनेक वेळा खेळले आहेत, त्यामुळे हे वेगळे नाही. असे मत त्यांनी यावेळी मांडले. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार भारतीय हद्दीत घुसखोरीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सीमेवर अनेकदा चकमकी उडत आहेत. दहशतवाद्यांकडून जम्म-काश्मीरमधील सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह दोन्ही देशातील नागरीकांना 24 ऑक्टोबरला होणारा सामना रद्द करावा या मागणी करण्यात येत आहे.

  तर मॅच होणारच, BCCI चं स्पष्टीकरण

  भारतीय टीम पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही, असं मत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी मांडलं आहे. ‘काश्मीरमध्ये घडणाऱ्या हत्या दुःखद आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. जो भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रश्न आहे, तो आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत आहे, ज्यामध्ये आम्ही कोणत्याही देशासोबत खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आयसीसी स्पर्धा खेळाव्या लागतील’, असं वक्तव्य राजीव शुक्ला यांनी केलं.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *