Home » Uncategorized » SRH मॅनेजमेंटनं न सांगताच कर्णधारपद काढून घेतलं; David Warner चा मोठा खुलासा

SRH मॅनेजमेंटनं न सांगताच कर्णधारपद काढून घेतलं; David Warner चा मोठा खुलासा

srh-मॅनेजमेंटनं-न-सांगताच-कर्णधारपद-काढून-घेतलं;-david-warner-चा-मोठा-खुलासा

भावुक पोस्ट करत SRH चाहत्यांना अलविदा म्हटलेला David Warner पुन्हा भावुक, म्हणाला…

सनरायझर्स हैद्राबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैद्राबाद संघ (Sunrisers Hyderabad) यांच्यातील मतभेदाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. भावुक पोस्ट करत हैद्राबादच्या चाहत्यांना अलविदा म्हटलेल्या वॉर्नरने मनातील गोष्ट बोलुन दाखवली आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: सनरायझर्स हैद्राबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सनरायझर्स हैद्राबाद संघ (Sunrisers Hyderabad) यांच्यातील मतभेदाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. ‘सनरायझर्स हैद्राबाद मॅनेजमेंटने मला न सांगताच कर्णधारपद काढून घेतलं,’ असल्याचा खुलासा डेव्हिड वॉर्नरने केला आहे. यासोबतच त्याने आपल्याला सनरायझर्ससाठी खेळण्याची इच्छा आहे. परंतु ते आपल्या हाती नाही. मी पुन्हा पुनरागमन करेन अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. भावुक पोस्ट करत हैद्राबादच्या चाहत्यांना अलविदा म्हटलेल्या वॉर्नरने मनातील गोष्ट बोलुन दाखवली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दुसऱ्या टप्प्यात आधी वॉर्नरचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. संघव्यवस्थापन एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी त्याला खेळाडूंच्या डगआऊटमध्ये येण्यासदेखील मज्जाव केला. हे वाचा- ‘…मी त्याचा आदर करत नाही’, आपल्याच माजी खेळाडूवर भडकला Chris Gayle दरम्यान, यासर्वावर भाष्य करताना वॉर्नर म्हणाला, कोणताही निर्णय सर्वांच्या संमतीनं घेतला जातो. कर्णधारपदावरून मला का हटवण्यात आलं याचं कारण मला सांगण्यात आलं नाही. यापूर्वीची कामगिरी दुर्लक्षित करून चालणार नाही, फॉर्मच्या आधारावर हा निर्णय घेतला असेल तर कठीण आहे, हे मी सर्व संघाच्या मालकांचा आदर करत सांगत आहे. असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. तसेच, संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं जाण्याचा निर्णय माझ्यासाठी सहजरित्या स्वीकारण्यासारखा नव्हता. मी आपल्या संघासाठी १०० सामने खेळलो आहे. चेन्नईसोबतच्या सामन्यापूर्वी चार पाच सामन्यांमध्ये माझी कामगिरी खराब होती. माझे काही प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं कधीच मिळणार नाही असे वाटते, आपल्याला पुढे जावंच लागेल अशी भावुक भावना त्याने यावेळी व्यक्त केली. हे वाचा- गोल्डन बॉय Neeraj Chopra चा हटके लुक व्हायरल

  सनरायझर्ससाठी खेळण्याची इच्छा

  हैद्राबाद माझ्यासाठी माझं दुसरं घर आहे. इथे मला फार प्रेम मिळालं. पण आता पुढील वर्षी कदाचीत आम्ही एकत्र खेळणार नाही, असे संकेत मला मिळत आहेत. पण मला हैद्राबाद संघाकडून खेळायला आवडेल. अर्थात हा निर्णय संघ व्यवस्थापनावरच अवलंबून असेल. असे सांगत मी पुन्हा पुनरागमन करेन अशी अपेक्षा त्याले यावेळी व्यक्त केली आहे.

  भावुक पोस्ट करत SRH चाहत्यांना अलविदा

  ”अविस्मरणीय आठवणी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या संघाच्या सतत मागे उभे राहुन प्रोत्साहन देणाऱ्या चाहत्यांचे आभार. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी माझे आभाराचे दोन शब्दही कमी पडतील. हा सुखमयी प्रवास होता. मी आणि माझे कुटुंबीय तुम्हा सर्वांना मिस करू.” असे म्हणत वॉर्नरने SRH चाहत्यांना अलविदा म्हटले होते.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *