Home » Uncategorized » IPL 2021 : हिटमॅनने इतिहास घडवला, एकाच सामन्यात दोन विक्रम, एक नकोसा तर एक…

IPL 2021 : हिटमॅनने इतिहास घडवला, एकाच सामन्यात दोन विक्रम, एक नकोसा तर एक…

ipl-2021-:-हिटमॅनने-इतिहास-घडवला,-एकाच-सामन्यात-दोन-विक्रम,-एक-नकोसा-तर-एक…

दुखापतीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोलकात्याविरुद्धच्या (MI vs KKR) सामन्यातून पुन्हा एकदा मैदानात उतरला.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  अबुधाबी, 23 सप्टेंबर : दुखापतीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोलकात्याविरुद्धच्या (MI vs KKR) सामन्यातून पुन्हा एकदा मैदानात उतरला. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडच्या आपल्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने दोन विक्रम केले. यातला एक रेकॉर्ड त्याच्यासाठी चांगला तर एक रेकॉर्ड वाईट ठरला. रोहितच्या कोलकात्याविरुद्ध एक हजार रन झाल्या आहेत. आयपीएल इतिहासात एका टीमविरुद्ध एवढ्या रन करणारा रोहित एकमेव खेळाडू आहे. कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर मुंबईची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक या ओपनिंग जोडीने मुंबईला 9.2 ओव्हरमध्ये 78 रनची सुरुवात करून दिली. 30 बॉलमध्ये 33 रन करून रोहित आऊट झाला. सुनिल नारायणने रोहितला माघारी पाठवलं. रोहितने या सामन्याआधी कोलकात्याविरुद्ध 49.10 च्या सरासरीने आणि 133.06 च्या स्ट्राईक रेटने 982 रन केले होते. रोहितनंतर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) पंजाबविरुद्ध 943 रन आणि कोलकात्याविरुद्ध 915 रन केले. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीविरुद्ध 909 रन केले आहेत. रोहितचा नकोसा रेकॉर्ड याच सामन्यात रोहित शर्माच्या नावावर नकोसा रेकॉर्डही झाला. एका बॉलरने सर्वाधिक वेळा विकेट घेण्याच्या बाबतीत रोहित संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आला आहे. सुनिल नारायणने आयपीएलमध्ये 7 व्यांदा रोहितची विकेट घेतली. याआधी आयपीएलमध्ये झहीर खानने (Zaheer Khan) धोनीला (MS Dhoni), संदीप शर्माने (Sandeep Sharma) विराट कोहलीला (Virat Kohli) 7 वेळाच आऊट केलं.

  Published by:Shreyas

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *