Home » क्रीडा » T20 World Cup : 'ग्रुप ऑफ डेथ', दोन टीमना पहिल्या राऊंडलाच बाहेर व्हायचा धोका!

T20 World Cup : 'ग्रुप ऑफ डेथ', दोन टीमना पहिल्या राऊंडलाच बाहेर व्हायचा धोका!

t20-world-cup-:-'ग्रुप-ऑफ-डेथ',-दोन-टीमना-पहिल्या-राऊंडलाच-बाहेर-व्हायचा-धोका!

17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) ग्रुपची आयसीसीने (ICC) घोषणा केली आहे. सुपर-12 मध्ये दोन ग्रुप बनवण्यात आले आहेत, यातल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत-पाकिस्तान आहेत, याशिवाय न्यूझीलंड, अफगाणिस्तानच्या टीमही यात आहेत.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 16, 2021 07:30 PM IST

मुंबई, 16 जुलै : 17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या (T20 World Cup) ग्रुपची आयसीसीने (ICC) घोषणा केली आहे. सुपर-12 मध्ये दोन ग्रुप बनवण्यात आले आहेत, यातल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत-पाकिस्तान आहेत, याशिवाय न्यूझीलंड, अफगाणिस्तानच्या टीमही यात आहेत. राऊंड-1 मधून क्वालिफाय होणारी ग्रुप-एची टॉप टीम आणि ग्रुप बी मधली दुसरी टीम या ग्रुपमध्ये असेल. पण सुपर-12 मधल्या ग्रुप-1 ला ग्रुप ऑफ डेथ म्हणलं जात आहे, कारण या ग्रुपमध्ये 4 अशा टीम आहेत, ज्या आपला दिवस असेल तर मोठा उलटफेर करू शकतात. ग्रुप-1 मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजच्या टीम आहेत.

सुपर-12 राऊंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेन टीमच्या अडचणी वाढू शकतात, कारण दोनवेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज आणि टी-20 क्रिकेटमधली सगळ्यात आक्रमक टीम अशी ओळख असणारी इंग्लंड या ग्रुपमध्ये आहे. ऑस्ट्रेलियाची सध्याची टी-20 टीम कमजोर आहे. नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने 3 टी-20 मॅच हरून सीरिजही गमावली.

ऑस्ट्रेलियाचे दिग्गज टी-20 खेळाडू असलेले ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिस यांना या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली होती, पण ऑस्ट्रेलियाची बॉलिंग कमकुवत झाली आहे, याचा फायदा वेस्ट इंडिज आणि इंग्लंड उचलू शकतात. मागच्या एका वर्षात ऑस्ट्रेलियाने 15 पैकी 10 टी-20 मॅच गमावल्या आहेत, तर फक्त 5 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला.

दक्षिण आफ्रिकेच्या टीमची अवस्थाही तशीच आहे. खूप कमजोर बॅटिंगमुळे आफ्रिकेच्या टीमवरही ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडण्याचं संकट आहे. दक्षिण आफ्रिकेची कामगिरीही ऑस्ट्रेलियासारखीच झाली आहे. त्यांनीही एका वर्षात 15 पैकी 10 मॅच हरल्या आणि 5 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला.

मागच्या एका वर्षात वेस्ट इंडिजचं रेकॉर्डही फार खास राहिलं नाही. वेस्ट इंडिजने 15 पैकी 7 टी-20 मॅच गमावल्या, तर 7 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आणि एका मॅचचा निकाल लागला नाही. इंग्लंडची टी-20 क्रिकेटमधली कामगिरी गेल्या काही दिवसांमध्ये उत्कृष्ट झाली आहे. एका वर्षात इंग्लंडने 17 पैकी 11 टी-20 जिंकल्या, तर 5 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला.

पुन्हा ‘मौका मौका’, T20 World Cup मध्ये भारत-पाकिस्तान लढत

टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या नियमांनुसार प्रत्येक ग्रुपच्या टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवतील. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला चांगली कामगिरी करणं भाग आहे, कारण इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसारख्या मजबूत टीम त्यांना पराभूत करून सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतात.

ग्रुप-1

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्यासह ग्रुप-एचा विजेता आणि ग्रुप-बीचा उपविजेता

ग्रुप-2

भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ग्रुप एचा उपविजेता आणि ग्रुप बीचा विजेता

Published by: Shreyas

First published: July 16, 2021, 6:47 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed