Home » क्रीडा » क्रीडा मंत्र्याची रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये निवड, झळकावलं आहे त्रिशतक!

क्रीडा मंत्र्याची रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये निवड, झळकावलं आहे त्रिशतक!

क्रीडा-मंत्र्याची-रणजी-ट्रॉफीच्या-टीममध्ये-निवड,-झळकावलं-आहे-त्रिशतक!

यावर्षी विधानसभा निवडणुकीतून राजकीय इनिंगची सुरुवात करणारा पश्चिम बंगालचा (West Bengal Assembly Elections) क्रीडा मंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwary) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 20, 2021 04:41 PM IST

कोलकाता, 20 जुलै : यावर्षी विधानसभा निवडणुकीतून राजकीय इनिंगची सुरुवात करणारा पश्चिम बंगालचा (West Bengal Assembly Elections) क्रीडा मंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwary) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. मनोज तिवारीची बंगाल क्रिकेटच्या (Bengal Cricket) संभाव्या 39 खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली आहे. बंगालचा माजी कर्णधार असणाऱ्या मनोज तिवारीने मार्च 2020 साली सौराष्ट्रविरुद्ध अखेरची रणजी ट्रॉफी मॅच खेळली होती. मनोज तिवारी शिवपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकला होता. मी फिटनेस कायम ठेवीन आणि बंगालसाठी आणखी काही खेळेन, असं मनोज तिवारी निवडणूक जिंकल्यानंतर म्हणाला होता.

बंगालच्या खेळाडूंचं शिबीर 23 जुलैपासून सुरू होणार आहे. मनोज तिवारी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळला आहे. 12 वनडेमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकासह त्याने 287 रन केले, तसंच लेग स्पिनर असलेल्या तिवारीने 12 विकेटही घेतल्या. 3 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये त्याने 15 रन केले. जुलै 2015 साली त्याने अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती, यानंतर त्याला भारताकडून खेळता आलं नाही.

प्रथम श्रेणीमध्ये मनोज तिवारीचं रेकॉर्ड चांगलं आहे. त्याने 125 मॅचमध्ये 50 च्या सरासरीने 8,965 रन केले, यामध्ये 25 शतकं आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 303 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. यासह त्याने 31 विकेटही घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये मनोज तिवारीने 163 सामन्यांमध्ये 42 च्या सरासरीने 5,466 रन केले, यात 6 शतकं आणि 40 अर्धशतकं आहेत, तसंच त्याने 60 विकेटही घेतल्या आहेत.

बंगालच्या या दिग्गज क्रिकेटपटूने आयपीएलमध्ये 10 मोसम खेळले. 2008 पासून ते 2018 पर्यंत तो आयपीएल खेळत होता. 98 मॅचमध्ये 29 च्या सरासरीने मनोज तिवारीने 1,695 रन केले आणि 7 अर्धशतकं लगावली. दिल्ली, कोलकाता, पंजाब आणि पुण्याच्या टीममध्ये मनोज तिवारीला संधी मिळाली होती. एकूण 183 टी-20 मध्ये त्याने 13 अर्धशतकांसह 3,436 रन केले आणि 34 विकेट मिळवल्या.

Published by: Shreyas

First published: July 20, 2021, 4:41 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed