Home » क्रीडा » Tokyo Olympics : भारत आणि पाकिस्तानमध्ये गोल्ड मेडलसाठी होणार महामुकाबला

Tokyo Olympics : भारत आणि पाकिस्तानमध्ये गोल्ड मेडलसाठी होणार महामुकाबला

tokyo-olympics-:-भारत-आणि-पाकिस्तानमध्ये-गोल्ड-मेडलसाठी-होणार-महामुकाबला

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही देशांसाठी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. क्रिकेट किंवा हॉकीत नाही तर एथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठी हे दोन्ही देश शनिवारी एकमेकांच्या विरुद्ध उतरणार आहेत.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही देशांसाठी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. क्रिकेट किंवा हॉकीत नाही तर एथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल जिंकण्यासाठी हे दोन्ही देश शनिवारी एकमेकांच्या विरुद्ध उतरणार आहेत.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  टोकयो, 7 ऑगस्ट :  भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही देशांसाठी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी क्रिकेटच्या मैदानात दोन्ही देश एकमेकांच्या समोर येणार नाहीत. तसंच हॉकीची देखील लढत नाही. तर भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Javelin throw final ) दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांच्या समोर येतील. शनिवारी दुपारी होणाऱ्या या लढतीमध्ये भारताचा नीरज चोप्रा  (Neeraj Chopra) आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम (Arshad Nadeem) हे दोघे जण गोल्ड मेडलसाठी उतरणार आहेत. या दोघांनीही प्राथमिक फेरीत आपआपल्या गटात चांगली कामगिरी करत मेडल मिळवण्याची आशा कायम ठेवली आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रानं 86.65 मीटर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला. तर अर्शदनं 85.16 मीटर भाला फेक करत  तिसरा  क्रमांक पटकावला.  नीरज ग्रुप ए मध्ये तर अर्शद ग्रुप बी मध्ये होता. भारताला एथलेटिक्समध्ये आजवर एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतरानं हुकलं होतं. हा दुष्काळ नीरज  यंदा संपवेल अशी देशाला आशा आहे. अर्शदकडून पाकिस्तानलाही हीच आशा आहे. यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड तर अर्शदनं ब्रॉन्झ मेडल मिळवले होते. आता ऑलिम्पिकमध्ये या दोघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. Tokyo Olympics : अदिती अशोकचं मेडल हुकलं, एका स्ट्रोकमुळे ठरली दुर्दैवी अर्शदला क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं. पण नीरजचा खेळ पाहून त्यानं भालाफेकीक करिअर करण्याचा निर्णय घेतला. 2018 साली एशियन गेम्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर अर्शदनंच याचा खुलासा केला होता. या दोघांना जर्मनीच्या जोहानेस वेटरचं कडवं आव्हान असेल. त्याने 85.64 मीटर भालाफेक करत दुसऱ्या क्रमांकासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

  Published by:Maharashtra Maza News

  First published:

  Leave a Reply

  Your email address will not be published.