Home » क्रीडा » गुड न्यूज… 9.30 वाजता सुरु होणार मॅच, पाहा किती ओव्हरचा होणार सामना?

गुड न्यूज… 9.30 वाजता सुरु होणार मॅच, पाहा किती ओव्हरचा होणार सामना?

गुड-न्यूज…-9.30-वाजता-सुरु-होणार-मॅच,-पाहा-किती-ओव्हरचा-होणार-सामना?

नागपूर, 23 सप्टेंबर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातला दुसरा टी20 सामना आज नागपुरात खेळवण्यात येतोय. पण ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना नियोजित वेळेत सुरु झाला नाही. मात्र हा सामना साडे नऊ वाजता सुरु करण्याचा निर्णय अम्पायर्सनी घेतला आहे. त्यासाठी 9.15 वाजता नाणेफेक करण्यात आली त्यावेळी टीम इंडियानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला असून भारतीय संघात त्यानं दोन बदल केले आहेत. या सामन्यासाठी रोहितनं उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारला वगळलं आहे. तर रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराचं कमबॅक झालं आहे. भारतीय संघ – रोहित, विराट, सूर्यकुमार, लोकेश राहुल, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, 8-8 ओव्हरचा सामना अम्पायर्सनी सांगितल्याप्रमाणे हा सामना 8-8 ओव्हरचा होणार आहे. तर दोन ओव्हरचा पॉवरप्ले असेल.

1st Innings: 9:30 -10:04 PM Interval: 10:04 – 10:14 PM 2nd Innings: 10:14-10:48 PM Powerplay 2 Overs A maximum of 2 Overs per bowler No in game penalty for Slow-Over rate No drinks break#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/7cw5nsyjAS — BCCI (@BCCI) September 23, 2022

चार वेळा पाहणी दरम्यान या मॅचमध्ये आतापर्यंत चार वेळा अम्पायर्सनी मैदानाची पाहणी केली. आऊटफिल्ड ओली असल्यानं 6.30 वाजता होणारी नाणेफेक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सात वाजता अम्पायर्सनी दुसऱ्यांदा मैदानाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी आणखी एक तास उशीरानं पाहणी करणार असल्याचं सांगितलं. अखेर अम्पायर्सनी 8.45 वाजता शेवटची पाहणी करुन खेळ सुरु होणार असल्याची घोषणा केली. मालिकेत ऑस्ट्रेलिया आघाडीवर मोहालीत झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं 209 धावांचं विशाल लक्ष्य उभारुनही ऑस्ट्रेलियानं 4 विकेट्सनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे नागपूरमधली दुसरी लढत टीम इंडियासाठी निर्णायक ठरणार आहे. भारताला या मालिकेतलं आव्हान राखायचं असेल तर जिंकणं गरजेचं आहे.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.