Home » क्रीडा » पाणीपुरी विकणारा हा मुलगा टीम इंडियात येण्यासाठी सज्ज, ठोकलं आणखी एक द्विशतक

पाणीपुरी विकणारा हा मुलगा टीम इंडियात येण्यासाठी सज्ज, ठोकलं आणखी एक द्विशतक

पाणीपुरी-विकणारा-हा-मुलगा-टीम-इंडियात-येण्यासाठी-सज्ज,-ठोकलं-आणखी-एक-द्विशतक

मुंबई, 23 सप्टेंबर: मुंबईनं भारतीय क्रिकेटला आजवर अनेक हिरे दिले आहेत. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मापासून ते अगदी पृथ्वी शॉपासून ते श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादवपर्यंत. मुंबईच्या या खेळाडूंचं भारतीय क्रिकेटमधलं योगदान फार मोठं आहे. पण याच खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेऊन, त्यांचा आदर्श घेत मुंबईचे अनेक युवा क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपला दबदबा निर्माण करतायत. त्यापैकीच एक नाव आहे यशस्वी जयस्वाल. यशस्वीचा सुपर फॉर्म यशस्वी जयस्वालनं गेल्या सात सामन्यात तब्बल पाच शतकं ठोकली आहेत. त्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. सध्या सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये यशस्वीनं वेस्ट झोनकडून खेळताना द्विशतकी खेळी केली. साऊथ झोनविरुद्धच्या या सामन्यात यशस्वीनं आज तिसऱ्या दिवसअखेर नाबाद 209 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीत 23 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. रणजीपासून शतकांचा धडाका जूनमध्ये रणजी करंडकाच्या क्वार्टर फायनलपासून यशस्वीनं शतकांचा धडाका लावलाय. त्यानं उत्तराखंडविरुद्ध 103 धावा केल्या. त्यानंतर सेमी फायनलमध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध यशस्वीनं दोन्ही डावात शतकं ठोकण्याचा पराक्रम गाजवलाय. त्यानं या दोन्ही डावात अनुक्रमे 100 आणि 181 धावा केल्या. मध्य प्रदेशविरुद्धच्या फायनलमध्ये तो पहिल्या डावात 78 धावावर बाद झाला. मुंबईनं फायनल गमावली पण यशस्वीच्या कामगिरीचं अनेकांनी कौतुक केलं. रणजी ट्रॉफीनंतर दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात यशस्वीनं 208 धावा फटकावल्या. सेमीफायनलमध्ये त्याला मोठी खेळी करता आली नाही पण ती कसर त्यानं फायनलमध्ये भरुन काढताना साऊथ झोनविरुद्ध दमदार द्विशतक झळकावलं. या खेळीमुळे यशस्वीनं बीसीसीआयच्या निवड समिती सदस्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Yashasvi Jaiswal. Duleep Trophy final. 209* 🔥💗pic.twitter.com/liHFLoalL2

— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 23, 2022

हेही वाचा – Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजाला अनेक संघांकडून ऑफर, पाहा अखेर IPL मध्ये कुणाकडून खेळणार ‘सर’ जाडेजा? यशस्वीची यशोगाथा उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी यशस्वी मुंबईत आला तेही फक्त क्रिकेटसाठी. त्यासाठी त्यानं अनेक खस्ताही खाल्ल्या. मुंबईच्या आझाद मैदानावर एका तंबूत तो राहायचा. पोटापाण्यासाठी त्यानं कधीकाळी रस्त्यावर पाणीपुरीही विकली. पण यशस्वीचं क्रिकेटचं वेड कायम होतं. आझाद मैदानावर तो दिवसभर क्रिकेट खेळायचा. क्रिकेट पाहायचा. पण याच खडतर प्रवासात त्याला प्रशिक्षक ज्वाला सिंग यांची साथ लाभली. ज्वाला सिंग यांनी आझाद मैदानावर राहणाऱ्या यशस्वीमधली गुणवत्ता अचूक हेरली आणि सुरु झाली ‘यशस्वी’ घोडदौड. रिझवी स्कूलकडून यशस्वीनं शालेय क्रिकेट गाजवलं. मग मुंबईच्या वयोगटातील संघात स्थान मिळवलं. अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं. मुंबईकडून खेळताना केलेल्या कमालीच्या कामगिरीमुळे त्यानं भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप संघातही स्थान मिळवलं. पण दुर्देवानं यशस्वीच्या त्या संघाला बांगलादेशविरुद्ध फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आयपीएलमध्ये कोटींची बोली देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशस्वीची ही घोडदौड सुरु असतानाच 2020 साली आयपीएलच्या ऑक्शनमध्ये यशस्वीला सव्वा दोन कोटींची बोली लागली. त्याला राजस्थान संघानं आपल्या ताफ्यात घेतलं. गोली दोन वर्ष यशस्वी राजस्थान रॉयल्सचा भाग आहे.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.