Home » क्रीडा » भारत-ऑस्ट्रेलिया नागपूर टी20 उशीरानं सुरु होणार… पाहा कधी होणार टॉस?

भारत-ऑस्ट्रेलिया नागपूर टी20 उशीरानं सुरु होणार… पाहा कधी होणार टॉस?

भारत-ऑस्ट्रेलिया-नागपूर-टी20-उशीरानं-सुरु-होणार…-पाहा-कधी-होणार-टॉस?

नागपूर, 23 सप्टेंबर: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातला दुसरा टी20 सामना आज नागपुरात खेळवण्यात येतोय. पण ओल्या आऊटफिल्डमुळे हा सामना नियोजित वेळेत सुरु होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आऊटफिल्ड ओली असल्यानं 6.30 वाजता होणारी नाणेफेक आता पुढे ढकलण्यात आली नाही. त्यामुळे सामना फार उशीरानं सुरु झाल्यास ओव्हर्स कमी केल्या जाण्याची शक्यता आहे. दरम्यान सात वाजता दोन्ही अम्पायर्स पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करतील आणि त्यानंतर या मॅचचा टॉस कधी होणार याचा निर्णय घेतला जाईल. मोहालीत झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियानं 209 धावांचं विशाल लक्ष्य उभारुनही ऑस्ट्रेलियानं 4 विकेट्सनी विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे नागपूरमधली दुसरी लढत टीम इंडियासाठी निर्णायक ठरणार आहे. भारताला या मालिकेतलं आव्हान राखायचं असेल तर जिंकणं गरजेचं आहे. नागपुरात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माहितीनुसार आज संध्याकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेले काही दिवस संध्याकाळच्या वेळेत नियमितपणे नागपुरात पावसानं हजेरी लावली आहे. आजही संध्याकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हेही वाचा – Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजाला अनेक संघांकडून ऑफर, पाहा अखेर IPL मध्ये कुणाकडून खेळणार ‘सर’ जाडेजा?

बुमराचं कमबॅक पक्कं भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी गोलंदाजीत मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टी20त 208 धावांचा डोंगर उभारुनही भारतीय संघावर पराभवाची नामुष्की आली होती. त्यामुळे रोहित शर्मा त्याचा हुकमी एक्का आज वापरणार हे त्यानं मोहालीतच सांगितलं होतं. आशिया कपआधी झालेल्या दुखापतीतून सावरलेला जसप्रीत बुमरा पुन्हा एकदा कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. मोहालीतल्या पहिल्या सामन्यात बुमराला विश्रांती देण्यात आली होती.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.