Home » क्रीडा » भारत-पाक महामुकाबल्याआधी आयसीसीनं केली महत्वाची घोषणा, चाहत्यांची घोर निराशा

भारत-पाक महामुकाबल्याआधी आयसीसीनं केली महत्वाची घोषणा, चाहत्यांची घोर निराशा

भारत-पाक-महामुकाबल्याआधी-आयसीसीनं-केली-महत्वाची-घोषणा,-चाहत्यांची-घोर-निराशा

मेलबर्न, 15 सप्टेंबर: आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान संघात दोन वेळा महामुकाबला रंगला. त्यात एकदा भारतानं तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताननं बाजी मारली. पण अवघ्या दीड महिन्यानंतर या दोन संघात पुन्हा एकदा लढत होणार आहे आणि तीही वर्ल्ड कपच्या रणांगणात. येत्या 16 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कपचं बिगुल वाजणार आहे. याच वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सलामीचा सामना रंगणार आहे तो पाकिस्तानसोबत. महत्वाची बाब म्हणजे या सामन्यासाठी क्रिकेट चाहते इतके उत्सुक आहेत की सामन्याच्या सव्वा महिना आधीच सगळी तिकीटं बुक झाली आहेत. तिकीट खिडकीवर हाऊसफुलचा बोर्ड 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप मोहिमेतला आपला पहिला सामना खेळणार आहे. पण या सामन्याची सगळ्य़ा तिकीटांची विक्री झाल्याचं आयसीसीनं जाहीर केलं आहे. इतकच नव्हे तर या सामन्यासाठी काही अतिरिक्त तिकीटंही जारी करण्यात आली होती. पण ती तिकीटंही अवघ्या काही मिनिटात विकली गेली. महत्वाचं म्हणजे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची प्रेक्षक क्षमता तब्बल 1 लाख एवढी आहे. पराभवाचा बदला घेण्याची संधी गेल्या वर्षी यूएईत झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतानं पाकिस्तानकडून स्वीकारलेला हा पहिलाच पराभव होता. पण वर्षभरातच त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियासमोर चालून आली आहे. नुकत्याच झालेल्या आशिया कपमध्येही सुपर फोरच्या महत्वाच्या सामन्यात पाकिस्ताननं भारताला मात दिली. त्यामुळे भारताचं आशिया कपमध्ये फायनल गाठण्याची आणि किंबहुना आशिया कप जिंकण्याची संधी हुकली. त्यामुळे मेलबर्नच्या मैदानात भारतीय संघ पाकिस्तानला धूळ चारेल अशी अपेक्षा आहे. हेही वाचा – T20 World Cup मधून बाहेर, रविंद्र जडेजानं चाहत्यांशी शेअर केली मनातली गोष्ट

भारतीय संघाची घोषणा आगामी विश्वचषकासाठी सोमवारी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात हा संघ यंदा वर्ल्ड कप मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. येत्या 5 ऑक्टोबरला हा संघ ऑस्ट्रेलियाला प्रयाण करेल. वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग स्टँड बाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.