Home » क्रीडा » सौरव गांगुलीकडे लवकरच मोठी जबाबदारी? ICC अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीचं नाव?

सौरव गांगुलीकडे लवकरच मोठी जबाबदारी? ICC अध्यक्षपदाच्या शर्यतीत गांगुलीचं नाव?

सौरव-गांगुलीकडे-लवकरच-मोठी-जबाबदारी?-icc-अध्यक्षपदाच्या-शर्यतीत-गांगुलीचं-नाव?

मुंबई, 25 सप्टेंबर: काल सुप्रीम कोर्टानं ग्रीन सिग्नल दिल्यानं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह हे 2025 पर्यंत आपापल्या पदावर कायम राहणार आहे. बीसीसीआयनं कूलिंग ऑफ पिरियड हटवण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं मान्य केली. त्यामुळे गांगुली आणि शाह यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा वाढ झाली. पण आता मिळालेल्या माहितीनुसार सौरव गांगुली आयसीसीच्या एका मोठ्या पदावर नियुक्त होण्याची शक्यता आहे. आयसीसी चेअरमनपदाच्या शर्यतीत गांगुली? आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर सौरव गांगुली अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याची शक्यता आहे. अध्यक्ष निवडीच्या या प्रक्रियेत निवडून येण्यासाठी 16 सदस्यीय मंडळापैकी नऊ जणांच्या मतांची आवश्यकता असते. बीसीसीआयचा गांगुलींच्या या निवडीसाठी पाठिंबा असल्याची माहिती आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कोण? बार्कले यांच्या जागी जर सौरव गांगुली आयसीसीचे अध्यक्ष झाले तर बीसीसीआय अध्यक्षपद रिक्त होणार आहे. त्यामुळे त्याजागी कदाचित विद्यमान सेक्रेटरी जय शाह यांची वर्णी लागू शकते असा अंदाज आहे. तर बीसीसीआयचे अरुण धुमल शाह यांची जागा घेतील अशी माहिती आहे. हेही वाचा – T20 World Cup: धक्कादायक… टी20 लीग गाजवणारे दोन खेळाडू वेस्ट इंडिज टीममधून का झाले आऊट?

दालमिया, पवारांच्या पंक्तीत गांगुलींना स्थान? सौरव गांगुलींची जर आयसीसी अध्यक्षपदी निवड झाली तर आयसीसीच्या मोठ्या पदावर विराजमान होणारे ते पाचवे भारतीय ठरतील. याआधी जगमोहन दालमिया (1997-2000), शरद पवार (2010-2012) यांनी आयसीसीचं अध्यक्षपद भूषवलं होतं. त्यानंतर एन श्रीनिवास (2014-15) आणि शशांक मनोहर (2015-2020) हेही चेअरमनपदी विराजमान झाले होते.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.