Home » क्रीडा » टाटा मोटर्स लॉंच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

टाटा मोटर्स लॉंच करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

टाटा-मोटर्स-लॉंच-करणार-सर्वात-स्वस्त-इलेक्ट्रिक-कार

मुंबई : इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric Vehicle) खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. इंधनाचे वाढते दर, वाढतं वायू प्रदूषण आदी कारणांमुळे ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटर, कार खरेदीला पसंती देत आहेत. सरकारदेखील इलेक्ट्रिक वाहन वापरासाठी प्रोत्साहन देत आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहनं उपलब्ध आहेत. या वाहनांमध्ये खास फीचर्स देण्यात आली आहेत. पण त्यांच्या किमती जास्त आहेत. तुम्ही जर इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण टाटा मोटर्स लवकरच टियागो ईव्ही (Tata Tiago EV) ही नवी इलेक्ट्रिक कार बाजारात लॉंच करणार आहे. ऑल न्यू टाटा टियागो ईव्ही 28 सप्टेंबर 2022 रोजी भारतात जागतिक पदार्पण करेल, अशी अधिकृत पुष्टी या भारतीय वाहन उत्पादक कंपनीनं केली आहे. या नवीन ईव्ही मॉडेलमध्ये खास फीचर्स देण्यात आली आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या कारची किंमत अन्य इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत खूप कमी असेल. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. देशात विक्री होणारी ही सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार (Electric Car) असेल. टाटा टियागो ही कंपनीची एंट्री लेव्हल आयसीई हॅचबॅक (ICE Hatchback) असून, हे नवं मॉडेल त्यासारखं इलेक्ट्रिक व्हर्जन असू शकतं. टाटा टियागो ईव्हीच्या किमतीचा विचार केला तर, या कारची एक्स-शोरुम किंमत 10 लाख रुपये असू शकते. यामुळे ही कार भारतातली सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार ठरेल. टाटा टियागो ईव्ही ही भारतातली पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल आणि कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये टिगॉर ईव्हीच्या (Tigor EV) नंतर तिचा समावेश असेल. टाटा मोटर्सनं अद्याप टियागो ईव्हीच्या स्पेसिफिकेशन किंवा अन्य फीचर्सविषयी खुलासा केलेला नाही. तथापि,कंपनीच्या इलेक्ट्रिक सेडान टिगॉर ईव्हीसारखीच तांत्रिक वैशिष्ट्यं टियागो ईव्हीमध्ये असतील असं बोललं जात आहे. मागील वर्षी पीव्ही सेगमेंटमध्ये टिगॉर ईव्ही भारतात लॉंच करण्यात आली होती. स्पेसिफिकेशनचा विचार करता टिगॉर ईव्हीमध्ये टाटाची प्रगत झिपट्रॉन टेक्नॉलॉजी (Ziptron Technology) वापरण्यात आली आहे. या टेक्नॉलॉजीत पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटार वापरली जाते. ही पॉवरट्रेन 74bhp, 170 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार 5.7 सेकंदांत 0 ते 60 किमी प्रतितास इतका वेग घेऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. याशिवाय या इलेक्ट्रिक कारमध्ये 26 kwh लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. ही बॅटरी प्रतिचार्ज 302 किमीची एआरएआय प्रमणित रेंज देते. आगामी टाटा टियागो ईव्हीमध्येदेखील हाच पॉवरट्रेन मिळण्याची अपेक्षा आहे. तसंच मोटर, मोटरची पॉवर आणि टॉर्क, बॅटरी पॅक आणि तिची रेंज टिगॉर ईव्ही सारखीच असण्याची शक्यता आहे. जागतिक एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये टिगॉर ईव्हीला 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. त्यामुळे टियागो ईव्ही हीदेखील पूर्ण सुरक्षित असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Electric vehicles

Leave a Reply

Your email address will not be published.