Home » क्रीडा » IND vs SL : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं सांगितलं ऐतिहासिक सिक्सचं रहस्य!

IND vs SL : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं सांगितलं ऐतिहासिक सिक्सचं रहस्य!

ind-vs-sl-:-मुंबई-इंडियन्सच्या-खेळाडूनं-सांगितलं-ऐतिहासिक-सिक्सचं-रहस्य!

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विकेटकिपर-बॅट्समन इशान किशननं (Ishan Kishan) वन-डे पदार्पणातच कमाल केली आहे. इशाननं वन-डे क्रिकेटमधील पहिल्याच बॉलवर सिक्स लगावला. इशाननं मॅचनंतर या सिक्सचं रहस्य सांगितलं आहे.

  • Maharashtra Maza News
  • Last Updated: Jul 19, 2021 03:42 PM IST

कोलंबो, 19 जुलै: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) विकेटकिपर-बॅट्समन इशान किशननं (Ishan Kishan) वन-डे पदार्पणातच कमाल केली आहे. तिसऱ्या नंबरवर आलेल्या इशाननं 42 बॉलमध्ये 59 रन काढले. या खेळीमध्ये इशाननं 8 फोर आणि 2 सिक्स लगावले. टी20 आणि वन-डे या क्रिकेटमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्डही इशाननं केला आहे.

इशाननं वन-डे क्रिकेटमधील पहिल्याच बॉलवर सिक्स लगावला. धनंजया डि सिल्वाच्या (Dhananjaya De Silva) बॉलिंगवर त्याने पहिल्याच बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या बॉलवर फोर मारत 2 बॉलमध्येच 10 रन केले. याआधी वर्षाच्या सुरुवतीला इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) दुसऱ्या टी-20 मधून इशान किशनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला बॉल जोफ्रा आर्चरचा (Jofra Archer) खेळला. या बॉलवर त्याने फोर मारत आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दिमाखात सुरुवात केली. यानंतर आता वनडे क्रिकेटमध्येही त्याने याची पुनरावृत्ती केली.

मॅच संपल्यानंतर इशाननं या ऐतिहासिक सिक्सचे रहस्य सांगितले. ‘मी पहिल्या बॉलवर सिक्स मारण्याच्या निर्धारानंच मैदानात उतरलो होतो. टीममधील सर्वांना ही गोष्ट माहिती होती. आज माझा दिवस होता. विकेट बॅटींगसाठी चांगले होते. त्यामुळे बॅटींगला आल्यानंतर समोर कोणताही बॅट्समन असला तरी सिक्स मारण्याचं मी ठरवलं होतं.

सर्वात विशेष बाब म्हणजे आज माझा जन्मदिवस होता. त्याच दिवशी मी पहिली वन-डे खेळलो. मला प्रत्येक जण रिटर्न गिफ्ट मागत होता. आजच्या दिवशी चांगली खेळी करत टीमच्या विजयात हातभार लावण्याची माझी इच्छा होती.’ असे इशानने स्पष्ट केले.

Ishan Kishan hit his first ball in ODIs for a six. What a start to his ODI career. Earlier this year, Suryakumar Yadav hit his first ball in T20Is for a six #SLvIND pic.twitter.com/YOu0ud49mT

— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) July 18, 2021

Euro Cup जिंकल्याच्या आनंदात कोरोनाचा विसर, इटलीमध्ये तिसऱ्या लाटेचा धोका

द्रविडनं दिली होती कल्पना

‘मी तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला येणार असल्याची कल्पना कोच राहुल द्रविडनं (Rahul Dravid) यापूर्वीच दिली होती. त्यांनी मला ते प्रॅक्टीस सेशनच्या वेळीच सांगितले होते. त्यामुळे मी नव्या बॉलनं बराच काळ अभ्यास केला होता.’ असा खुलासाही इशाननं केला.

Published by: Maharashtra Maza News

First published: July 19, 2021, 1:23 PM IST

Leave a Reply

Your email address will not be published.