Home » क्रीडा » रिषभ पंत बनला उत्तराखंडचा ब्रँड अँबेसेडर, मुख्यमंत्री धामींकडून घोषणा

रिषभ पंत बनला उत्तराखंडचा ब्रँड अँबेसेडर, मुख्यमंत्री धामींकडून घोषणा

रिषभ-पंत-बनला-उत्तराखंडचा-ब्रँड-अँबेसेडर,-मुख्यमंत्री-धामींकडून-घोषणा

देहरादून, 11 ऑगस्ट:  टीम इंडियाचा युवा शिलेदार रिषभ पंत नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यावरुन भारतात परतला आहे. भारतात परतताच आज उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी पंतचा खास सन्मान केला. धामी यांनी रिषभ पंतची उत्तराखंडचा नवा ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. नवी दिल्लीतील उत्तराखंड सदनमध्ये आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमात धामी यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला रिषभ पंतनही हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री धामींच्या हस्ते पंतचा सत्कारही करण्यात आला. धामींकडून पंतचं कौतुक पंतचं कौतुक करताना धामी म्हणाले की “सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या रिषभनं केवळ आपली मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे ध्येय गाठलं आहे. त्याच्या या कामगिरीमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल. तसच उत्तराखंडचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंतची नियुक्ती करण्याचा हाच उद्देश आहे की राज्याच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देण्यास युवा खेळाडूंना त्याच्याकडून प्रेरणा मिळेल. उत्तराखंडमधील युवावर्ग देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करेल यासाठी राज्यात वातावरण निर्मिती केली जात आहे.”

भारतीय क्रिकेट टीम के होनहार खिलाड़ी व उत्तराखंड के सपूत श्री @RishabhPant17 जी को राज्य के युवाओं को खेल व स्वास्थ्य के प्रति प्रोत्साहित करने हेतु “राज्य ब्रांड एंबेसडर” बनाए जाने पर हार्दिक शुभकामनाएं। pic.twitter.com/EQ6aq6bVzh

— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 11, 2022

हेही वाचा – Arjun Tendulkar: सचिनचा लेक अर्जुन तेंडुलकर सोडणार मुंबई, पाहा कोणत्या संघाकडून खेळणार? रिषभ पंत मूळचा उत्तराखंडचा रिषभ पंतचा जन्म हा उत्तराखंडच्या रुरकीमधला. वयाच्या 12व्या वर्षापासून रिषभ त्याच्या आईसह प्रत्येक विकेंडला दिल्लीत यायचा. प्रशिक्षक तारक सिन्हा यांच्या अकादमीत त्यानं क्रिकेचे प्राथमिक धडे गिरवले. दिल्लीकडून तो अंडर-19 क्रिकेट खेळला. अंडर-19 क्रिकेटमध्ये दिल्ली आणि असाममधला सामना पंतच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा ठरला. त्यानं या सामन्यात 35 आणि 150 धावा केल्या. तिथून पुढे पंतची भारताच्या अंडर-19 विश्वचषक संघात वर्णी लागली. तिथेही त्यानं नेपाळविरुद्ध अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.