Home » क्रीडा » Ind vs Zim: लोकेश राहुल फिट, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची नव्यानं घोषणा

Ind vs Zim: लोकेश राहुल फिट, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची नव्यानं घोषणा

ind-vs-zim:-लोकेश-राहुल-फिट,-झिम्बाब्वे-दौऱ्यासाठी-टीम-इंडियाची-नव्यानं-घोषणा

मुंबई, 11 ऑगस्ट: 18 ऑगस्टपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली होती. दुखापतीमुळे लोकेश राहुलच त्या संघात समावेश करण्यात आला नव्हता. पण आता लोकेश राहुलनं फिटनेस टेस्ट पास केल्यामुळे त्याला भारतीय संघात जागा देण्यात आली आहे. इतकच नव्हे तर धवनऐवजी कर्णधारपदाची धुराही राहुलच्याच खांद्यावर सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपद धवनकडे देण्यात आलं आहे.

NEWS – KL Rahul cleared to play; set to lead Team India in Zimbabwe.

More details here – https://t.co/GVOcksqKHS #TeamIndia pic.twitter.com/1SdIJYu6hv — BCCI (@BCCI) August 11, 2022

राहुल फेब्रुवारीपासून संघाबाहेर लोकेश राहुल फेब्रुवारी महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पण त्यानंतर आयपीएल वगळता इतर मालिकांमध्ये मांडीच्या दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही. या दुखापतीमुळे इंग्लंड, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यालाही त्याला मुकावं लागलं होतं. आशिया चषक संघात वर्णी या महिन्याच्या अखेरीस संयुक्त अरब अरब अमिरातीत (UAE) खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतही लोकेश राहुल भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. त्यामुळे या महत्वाच्या मालिकेआधी झिम्बाव्बे दौरा ही राहुलसाठी चांगली संधी ठरावी. झिम्बाब्वे दौऱ्यातल्या तीन वन डे सामन्यानंतर तो आशिया चषकासाठी यूएईला रवाना होईल. हेही वाचा – Rishabh Pant: रिषभ पंत बनला उत्तराखंडचा ब्रँड अँबेसेडर, मुख्यमंत्री धामींकडून घोषणा असा असेल भारताचा झिम्बाब्वे दौरा 18 ऑगस्ट – पहिली वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 20 ऑगस्ट – दुसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब 22 ऑगस्ट – तिसरी वन डे, हरारे स्पोर्टस क्लब मालिकेतले तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वा. सुरु होतील भारतीय संघ – लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.