Home » क्रीडा » फलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर रुडी कर्टझन यांचं निधन

फलंदाजाला ‘स्लो मोशन’मध्ये आऊट देणारे अम्पायर रुडी कर्टझन यांचं निधन

फलंदाजाला-‘स्लो-मोशन’मध्ये-आऊट-देणारे-अम्पायर-रुडी-कर्टझन-यांचं-निधन

मुंबई, 09 ऑगस्ट: दक्षिण आफ्रिकेचे माजी अम्पायर रुडी कर्टझन यांचं नुकतच निधन झालं. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये एका रस्ते अपघातात कर्टझन यांचा मृत्यू झाला. 73 वर्षाचे कर्टझन गोल्फ खेळून परतत असताना हा अपघात झाला. यावेळी त्यांच्यासह असलेल्या दोघा मित्रांचाही या अपघातात मृत्यू झाला. रुडी कर्टझन यांनी आपल्या कारकीर्दीत तब्बल 209 वन डे, 108 कसोटी आणि 14 टी20 सामन्यात पंच म्हणून भूमिका बजावली होती. क्रिकेटच्या फिल्डवर फलंदाजाला अगदी स्लो मोशनमध्ये आऊट देणारे अंपायर अशी त्यांची ओळख होती. फलंदाजाला बाद देताना त्यांचं बोट अगदी हळुवारपणे वर येत असे. वेस्ट इंडिजचे माजी पंच स्टीव्ह बकनर यांच्यानंतर शंभर कसोटी सामन्यात अम्पायरिंग करणारे आणि ते दुसरे पंच ठरले होते. तर पहिल्यांदाच 200 वन डे सामन्यात पंचगिरी करण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर होता.

RIP Rudi Koertzen, the slow finger of doom. Some of the best umpiring aesthetics I’ve seen pic.twitter.com/XAqTSfDqS0

— Tom Carpenter (@Carpo34) August 9, 2022

18 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द रुडी कर्टझन यांनी 1992 साली अम्पायर म्हणून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तेव्हा भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. ही तीच मालिका होती ज्या मालिकेत रन आऊटसाठी पहिल्यांदा टेलिव्हिजन रिप्लेचा वापर करण्यात आला होता. 1997 साली ते आयसीसीचे पूर्ण वेळ अंपायर बनले. त्यानंतर 2002 साली ते आयसीसीच्या एलिट पॅनेलवर आले. 2003 आणि 2007 च्या वन डे विश्वचषकात रुडी तिसरे पंच होते. 2010 साली त्यांनी आपल्या अम्पायरिंगच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघातला कसोटी सामना हा त्यांच्या कारकीर्दीतला अखेरचा सामना ठरला. हेही वाचा – Ravindra Jadeja: पंतप्रधान मोदींनी का केलं जाडेजा आणि त्याच्या पत्नीचं कौतुक? जाणून घ्या कारण सेहवागकडून श्रद्धांजली टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनही ट्विट करुन रुडी यांना श्रद्धांजली वाहिली. आणि एक किस्साही सांगितला. सेहवाग म्हणतो ‘रुडी आणि माझे संबंध खूप चांगले होते. फलंदाजी करताना मी चुकीचा फटका खेळलो तर ते मला हे सांगून ओरडायचे की मला तुझा खेळ पाहायचा आहे.’

Vale Rudi Koertzen ! Om Shanti. Condolences to his family. Had a great relation with him. Whenever I used to play a rash shot, he used to scold me saying, “Play sensibly, I want to watch your batting”. One he wanted to buy a particular brand of cricket pads for his son (cont) pic.twitter.com/CSxtjGmKE9

— Virender Sehwag (@virendersehwag) August 9, 2022

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.