Home » क्रीडा » पी. व्ही. सिंधूची ‘सुवर्ण’भरारी, राष्ट्रकुल बॅडमिंटनमध्ये विक्रमी गोल्ड

पी. व्ही. सिंधूची ‘सुवर्ण’भरारी, राष्ट्रकुल बॅडमिंटनमध्ये विक्रमी गोल्ड

पी-व्ही.-सिंधूची-‘सुवर्ण’भरारी,-राष्ट्रकुल-बॅडमिंटनमध्ये-विक्रमी-गोल्ड

बर्मिंगहॅम, 08 ऑगस्ट: इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आज अखेरचा दिवस. या अखेरच्या दिवसाची सुरवात भारताची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू सिंधूच्या सोनेरी यशानं झाली. सिंधूनं राष्ट्रकुल स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला. महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूसमोर कॅनडाच्या मिशेल लीचं आव्हान होतं. हे आव्हान तिनं दोन सरळ सेट्समध्ये मोडीत काढलं. सिंधूनं हा सामना 21-15, 21-13 असा जिंकून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं आपलं पहिलं सुवर्णपदक पटकावलं. तर बर्मिंगहॅममध्ये भारतानं मिळवलेलं हे 19वं सुवर्ण ठरलं. अखेर सोनेरी यशाचं स्वप्न साकार 2014 साली सिंधून पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळली होती.  ग्लासगोतल्या त्या स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. पण 2018 साली गोल्ड कोस्टमध्ये सिंघूनं एक पाऊल पुढे टाकलं. गोल्ड कोस्टमध्ये सिंधूचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं. फायनलमधल्या पराभवामुळे तिला रौप्यपदक मिळालं. पण यंदा सिंधू बर्मिंगहॅममध्ये दाखल झाली ती सुवर्णपदक जिंकण्याच्या निर्धारानच. एकेरीच्या प्रत्येक सामन्यात तिनं दमदार कामगिरी बजावली. आणि फायनलमध्येही मिशेल लीविरुद्ध तिचा हाच फॉर्म कायम राहिला. हेही वाचा – CWG 2022: रोहितची टीम इंडियाही पाहत होती वुमन ब्रिगेडची फायनल, पण… महिला एकेरीत सिंधूचं एकतर्फी वर्चस्व यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूसमोर तसं सोपं आव्हान होतं. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या तुलनेत सिंधू अनुभवानं कित्येक पटीनं वरचढ होती. त्यामुळे सिंधूचं यंदाच्या स्पर्धेतलं गोल्ड मेडल आधीच पक्क मानलं जात होतं. राष्ट्रकुलमध्ये जपान, तैवान, चीन, स्पेन, दक्षिण कोरिया अशा बॅडमिंटनमध्ये अव्वल असलेल्या राष्ट्रांचा समावेश होत नाही. त्यामुळे सिंधूसाठी सोनेरी यशाचा हा प्रवास तुलनेत सोपा ठरला. मिश्र सांघिक गटात रौप्य सिंधूचा समावेश असलेल्या भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघानं यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक पटकावलं होतं. मिश्र सांघिक बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात एकेरीत सिंधूनं विजय मिळवला होता. पण इतर सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं होतं. पण सिंधून महिला एकेरीत ते अपयश धुवून काढताना सुवर्णपदक भारताच्या झोळीत टाकलं.

Published by:Siddhesh Kanase

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Badminton, Sport

Leave a Reply

Your email address will not be published.