Home » क्रीडा » CWG 2022 : बीडच्या शेतकरी पुत्राची कमाल, राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलं ऐतिहासिक पदक

CWG 2022 : बीडच्या शेतकरी पुत्राची कमाल, राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलं ऐतिहासिक पदक

cwg-2022-:-बीडच्या-शेतकरी-पुत्राची-कमाल,-राष्ट्रकुल-स्पर्धेत-जिंकलं-ऐतिहासिक-पदक

बर्मिंघम, 5 ऑगस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदक मिळवण्याची घोडदौड सुरुच आहे. आता बीडच्या शेतकरी पुत्राने राष्ट्रकुल स्पर्धेत कमाल केली आहे. अविनाश साबळे याने 3 हजार मीटर स्टीपलचेज स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत रौप्यपदक जिंकले आहे. अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडत 8:11:20 अशी वेळ नोंदवत हे रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल 2022 च्या नवव्या दिवशी भारताचे हे दुसरे पदक आहे. पदवीचे शिक्षण पुण्यातून पूर्ण –  जिद्द, चिकाटी अन सातत्य असेल तर शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, असंच बीडच्या गावखेड्यातील ऑलम्पिक धावपट्टू अविनाश साबळे यांनी करुन दाखवलं आहे. अविनाश साबळे हे भारतीय सैन्यात कार्यर आहेत तसेच ट्रॅक आणि फील्ड अॅथलिट आहेत. अविनाश साबळे हे 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1994 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात झाला आहे. त्यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव मुकुंद साबळे आणि भावाचे नाव योगेश साबळे आहे. अविनाश यांनी सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत केले आणि पदवीचे शिक्षण पुण्यातून पूर्ण केले. अविनाश हे सध्या आपल्या परिवारासोबत बंगळुरुमध्ये राहतात. 2011 मध्ये बारावीचे शिक्षण झाल्यावर ते सैन्यदला रुजू झाले. सैन्यदलात ते क्रीडाप्रकारात भाग घेऊ लागले. यानंतर 2015मध्ये त्यांनी आर्मी सर्विस टीमसाठी क्वालिफाय केले होते. यानंतर 2 वर्षांनी 2017मध्ये क्रॉस कंट्री चैंपियनशिपमध्येही त्यांनी सहभाग घेतला आणि मग सातत्याने चांगले प्रदर्शन केले. सध्या ते भारतीय सैन्यदलात जूनियर कमीशंड ऑफिसर (JCO) या पदावर कार्यरत आहेत. याआधी अमेरिकेत रचला इतिहास – याचवर्षी मे महिन्यात 5 हजार मीटर शर्यतीत 30 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत, अमेरिकेत अविनाश साबळे यांनी इतिहास रचला होता. अविनाश साबळेंच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी तोफा वाजवून आनंद साजरा केला होता. तर माझ्या मुलाने बीड जिल्ह्याचं नाव केलं आम्हाला खूप आनंद वाटतोय. असं म्हणत धावपट्टू अविनाश साबळेंच्या वडिलांची प्रतिक्रिया दिली होती. तर गतवर्षी 30 जुलै 2021 रोजी टोकियोत झालेल्या, 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत, अविनाश हिट 2 मध्ये सहभागी झाला होता. या हिटमध्ये त्याने आपले स्वतःचे 8.20.20 चे रेकॉर्ड मोडले. मात्र सातव्या क्रमवारीत आल्याने त्याची फायनलची संधी हुकली होती. तर यानंतर मे महिन्यात पुन्हा अविनाश यांनी 5 हजार मीटर शर्यतीत बहाद्दुर प्रसादचा 30 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला.

Published by:Maharashtra Maza News

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “CWG 2022 : बीडच्या शेतकरी पुत्राची कमाल, राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकलं ऐतिहासिक पदक

Leave a Reply

Your email address will not be published.