Home » क्रीडा » बजरंग पुनियला लागोपाठ दुसऱ्या कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक, भारताला 7वे गोल्ड!

बजरंग पुनियला लागोपाठ दुसऱ्या कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक, भारताला 7वे गोल्ड!

बजरंग-पुनियला-लागोपाठ-दुसऱ्या-कॉमनवेल्थमध्ये-सुवर्ण-पदक,-भारताला-7वे-गोल्ड!

बर्मिंघम, 5 ऑगस्ट : भारताचा स्टार पैलवान बजरंग पुनियाने (Bajarang Puniya) कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games) मध्ये रेसलिंगमध्ये भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं आहे. बजरंगचं कॉमनवेल्थ गेम्समधलं हे लागोपाठ दुसरं गोल्ड मेडल आहे. भारताला या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आतापर्यंत 7 गोल्ड मेडल मिळाली आहेत, तर भारताची पदकांची संख्या 22 पर्यंत झाली आहे. बजरंग पुनियाने फायनलमध्ये कॅनडाच्या लछलन मॅकनीलचा 9-2 ने पराभव केला. टोकयो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकणाऱ्या बजरंगने सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या जॉर्ज रॅमवर विजय मिळवत फायनल गाठली होती. बजरंग पुनिया पुरुषांच्या फ्री स्टाईल 65 किलो इव्हेंटमध्ये मॉरिशियसचा जीन गुलियाने जोरिस बांडोऊला एका मिनिटात 6-0 ने हरवून सेमी फायनलमध्ये पोहोचला होता. क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बजरंगला दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागला. सुरूवातीलाच त्याने नौरूच्या लोवे बिंघमला पाडून 4-0 ने विजय मिळवला. बजरंगने आपल्या प्रतिस्पर्ध्याला जाणून घ्यायला एक मिनिटाचा वेळ घेतला, यानंतर त्याने बिघंमला लोळवून मॅचच संपवली. अंशु मलिकलाही सिल्व्हर भारताची 21 वर्षांची रेसलर अंशु मलिकचं (Anshu Malik) गोल्ड मेडल मात्र थोडक्यात हुकलं. महिलांच्या 57 किलो वजनी गटात अंशुने सिल्व्हर मेडल जिंकलं. अंशुला फायनलमध्ये नायजेरियाच्या ओडुनायो अदेकुओरोयेने 6-4 ने पराभूत केलं. अंशुने फायनलआधी प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली होती. क्वार्टर फायनलमध्ये तिने ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिमियोनिडिस आणि सेमी फायनलमध्ये श्रीलंकेच्या नेथमी पोरूथोटागेवर तांत्रिक श्रेष्ठता (10-0) च्या आधारवर विजय मिळवला होता.

Published by:Shreyas

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “बजरंग पुनियला लागोपाठ दुसऱ्या कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक, भारताला 7वे गोल्ड!

Leave a Reply

Your email address will not be published.