Home » क्रीडा » T20 World Cup मध्ये असा करा पंतचा वापर! पॉण्टिंगने सांगितला फॉर्म्युला

T20 World Cup मध्ये असा करा पंतचा वापर! पॉण्टिंगने सांगितला फॉर्म्युला

t20-world-cup-मध्ये-असा-करा-पंतचा-वापर!-पॉण्टिंगने-सांगितला-फॉर्म्युला

ऋषभ पंत (Rishabh Pant) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाच्या जलद आणि बाऊन्स असलेल्या पिचवर धोकादायक ठरेल, असं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने (Ricky Pointing) मांडलं आहे.

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 10 जून : ऋषभ पंत (Rishabh Pant) टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाच्या जलद आणि बाऊन्स असलेल्या पिचवर धोकादायक ठरेल, असं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने (Ricky Pointing) मांडलं आहे. प्रत्येक मॅचच्या स्थितीनुसार ऋषभ पंतचा फ्लोटर (कोणत्याही क्रमांकावर) म्हणून वापर करावा, असा सल्ला पॉण्टिंगने टीम इंडियाला दिला आहे. पॉण्टिंग आयपीएलमध्ये (IPL 2022) ऋषभ पंतसोबत दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals) होता. पंत दिल्लीचा कॅप्टन तर पॉण्टिंग मुख्य प्रशिक्षक होता. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्याच राऊंडला बाहेर झाली होती. रिकी पॉण्टिंग आयसीसी रिव्ह्यूमध्ये म्हणाला, ‘ऋषभ पंत शानदार खेळाडू आहे. जो टी-20 वर्ल्ड कपमध्ये धोकादायक असेल. खासकरून ऑस्ट्रेलियाच्या सपाट, जलद आणि बाऊन्स असलेल्या खेळपट्टीवर. पंतच्या कामगिरीवर अनेकांचं लक्ष असेल.’ पाचव्या क्रमांकावर संधी ऋषभ पंतला फ्लोटर म्हणून खेळवलं जाऊ शकतं, भारतीय बॅटिंग लाईन अप मध्ये मी त्याला पाचव्या क्रमांकावर खेळवलं असतं. पण जर 7-8 ओव्हर शिल्लक असतील तेव्हा मी त्याला बॅटिंगला पाठवेन. एवढ्या उत्कृष्ट आणि आक्रमक खेळाडूचा वापर अशाच पद्धतीने केला पाहिजे, असं पॉण्टिंग म्हणाला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या ऋषभ पंतने या मोसमात 14 सामन्यांमध्ये फक्त 340 रन केले, यात त्याची सरासरी 30.91 ची होती. आयपीएलमधल्या कामगिरीने पंत निराश होता, अशी प्रतिक्रिया पॉण्टिंगने दिली. आयपीएलआधी तो खूप चांगली बॅटिंग करत होता, त्याची अशी बॅटिंग मी आधी पाहिली नव्हती, असं वक्तव्यही पॉण्टिंगने केलं.

  Published by:Shreyas

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Rishabh pant, T20 world cup, Team india

  Leave a Reply

  Your email address will not be published.