Home » क्रीडा » 35 शतकं झळकावणाऱ्या खेळाडूच्या बहिणीची बिकट अवस्था, फॅन्सना केलं इमोशनल आवाहन

35 शतकं झळकावणाऱ्या खेळाडूच्या बहिणीची बिकट अवस्था, फॅन्सना केलं इमोशनल आवाहन

35-शतकं-झळकावणाऱ्या-खेळाडूच्या-बहिणीची-बिकट-अवस्था,-फॅन्सना-केलं-इमोशनल-आवाहन

मुंबई, 12 जून : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्पटन (Nick Compton) वैयक्तिक आयुष्यात आव्हानांचा सामना करत आहे. त्यानं सोशल मीडियावर त्याच्या बहिणीविषयी एक  इमोशनल आवाहन केलं आहे. निकची बहिणीला ड्रग्ज आणि दारूचं व्यसन लागलं होतं. ती आता हे व्यसन सोडून नवं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नात तिला साथ देण्याचं आवाहन निकनं केलं आहे. निकनं यावेळी सांगितलं की, ‘त्याच्या बहिणीला ड्रग्ज आणि दारूचं व्यसन लागलं होतं. या व्यसनामध्ये तिला कसलीही शुद्ध राहात नसे. तिचं संपूर्ण आयुष्य यामुळे वाया गेले. एकदा नशेत असतानाच तिला अपघात झाला. या अपघातानंतर तिच्यावर कायमस्वरूपी व्हिल चेअरवर बसण्याची वेळ आली आहे.माझ्या बहिणीनं आता नवं आयुष्य सुरू केलंय. ती आता बहुतेक काळ पेटिंग करण्यात घालवते. तिनं इन्स्टाग्रामवर याचं एक पेज देखील सुरू केलं आहे. तिच्या या प्रयत्नांमध्ये साथ द्या,’ असं आवाहान निकनं फॅन्सना केलं आहे. निक कॉम्पटन इंग्लंडचा तंत्रशुद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखला जात असे. तो 2012 ते 2016 या कालावधीमध्ये इंग्लंडकडून 16 टेस्ट खेळला. यामध्ये त्यानं 2 शतक झळकावली. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड भक्कम असून त्या प्रकारात त्यानं 27 तर लिस्ट A श्रेणीच्या क्रिकेटमध्ये 6 अशी एकूण क्रिकेट कारकिर्दीमध्ये 35 शतकं झळकावली आहेत. निक कॉम्पटनचे आजोबा डेव्हिस कॉप्टन यांनीही इंग्लंडचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. ते 1937 ते 1957 या काळात 78 टेस्ट खेळले. श्रीलंकेनं 18 बॉलमध्ये केले 59 रन, कॅप्टनच्या वर्ल्ड रेकॉर्डपुढे कांगारू फेल विराटवर केली होती टीका टीम इंडिया मागील वर्षी इंग्लंड दौऱ्यावर असताना निकनं विराट कोहलीवर (Virat Kohli) वर जोरदार टीका केली होती.’विराट कोहली सर्वात जास्त आक्षेपार्ह वागणारा व्यक्ती नाही? मी 2012 साली झालेली शिवीगाळ कधीही विसरणार नाही. त्यावेळी मला धक्का बसला होता. कारण विराटनं सर्व सीमा ओलांडल्या होत्या. त्यामुळे जो रूट, सचिन तेंडुलकर आणि केन विल्यमसन हे किती शांत स्वभावाचे खेळाडू आहेत, हे आणखी ठळक होते.’ असं ट्विट कॉम्पटननं केलं होतं. विराट कोहलीच्या फॅन्सना कॉम्पटनची टीका आवडली नाही. त्यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं. इंग्लंड क्रिकेटपटूंनी यापूर्वी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, याची आठवण त्यांनी करुन दिली. त्यानंतर कॉम्पटननं हे ट्विट डिलिट केलं. पण तो पर्यंत हा सर्व प्रकार व्हायरल झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.