Home » क्रीडा » एक वेगळीच शक्ती जाणवते! सचिनने शेअर केली वडिलांच्या झोपाळ्या खास आठवण

एक वेगळीच शक्ती जाणवते! सचिनने शेअर केली वडिलांच्या झोपाळ्या खास आठवण

एक-वेगळीच-शक्ती-जाणवते!-सचिनने-शेअर-केली-वडिलांच्या-झोपाळ्या-खास-आठवण

नवी दिल्ली, 19 जून : जगभरातील लोक आज 19 जून 2022 रोजी फादर्स डे साजरा करत आहेत. दिग्गज क्रिकेटपटूही यामध्ये मागे नाहीत. त्यांनाही त्यांच्या वडिलांची या निमित्ताने आठवण येत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या वडिलांची आठवण शेअर केली आहे. आपण क्रिकेटर बनण्यात वडिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. याचा सचिनने अनेकदा उल्लेख केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने सचिनने मराठी कादंबरीकार असलेले वडील रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिनने वडिलांसोबतचे नाते, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. व्हिडिओमध्ये सचिनची आईही दिसत आहे. सचिनच्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक खास गोष्टीही सचिनने शेअर केल्या आहेत. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले आहे की, “प्रत्येक मुलाचा पहिला हिरो त्याचे वडील असतात. मी काही वेगळा नव्हतो आणि आजही माझा त्यावर विश्वास आहे. त्यांची शिकवण, त्यांचे प्रेम आणि त्यांनी मला माझा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य कसे दिले, हे मला अजूनही आठवते. सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा.” सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, “वडिलांनी आम्हाला नेहमीच शिकवले की आयुष्यात कधीही शॉर्टकट घेऊ नको. कोणत्याही आव्हानासाठी आणि ध्येयासाठी नेहमी स्वत:ला अधिक चांगले तयार कर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनातील मूल्ये कधीही सोडू नका. सचिन वडिलांचे हे शब्द आजही आठवतो आणि तो आपल्या आयुष्यात त्याचा अवलंब करतो.

Every child’s first Hero is his father. I was no different. Even today, I remember what he taught me, his unconditional love & how he let me find my own path. Happy Father’s Day everyone!#FathersDay pic.twitter.com/fgWQPr8jc6

— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 19, 2022

वडिलांनी कधीही सचिनवर आपली इच्छा लादली नाही – आई या व्हिडिओमध्ये सचिनच्या आईने म्हटले आहे की, वडिलांनी कधीही सचिन किंवा इतर मुलांवर आपली इच्छा लादली नाही. म्हणूनच जेव्हा मुलं वडिलांसोबतची त्यांची जुनी छायाचित्रे पाहतात तेव्हा त्यांना वडील काय होते, याची कल्पना येते. त्यामुळे वडील रमेश यांच्या निधनानंतरही सचिन आणि त्याच्या इतर भावांनाही त्यांची आठवण येते. या व्हिडिओच्या शेवटच्या भागात सचिनने एक झोपाळा दाखवला ज्यावर त्याचे वडील झोके घेत मोठे झाले. या कारणास्तव, हा पाळणा सचिनसाठी खास आहे आणि जुना असूनही त्याचा आजही तो वापर करतो. हे वाचा –  आपल्या चेहऱ्यावर भुवया का असतात? कारण आहे खूपच खास वडील ज्या झोक्यामध्ये झोके घ्यायचे तो आजही सचिनजवळ आहे. याबद्दल सचिन म्हणाला, “हा झोका माझ्यासाठी खूप खास आहे. जेव्हा मी त्यावर बसतो तेव्हा माझ्या हृदयात आणि मनात वेगवेगळे विचार येतात आणि मला वडील आठवतात, मला ते अधिक जवळचे वाटतात. हे वाचा – पावसाळा सुरू होताच मुलांना ताप भरतो; या 6 गोष्टींची घ्या नीट काळजी वडिलांच्या निधनानंतर त्याने विश्वकरंडकामध्ये शतक – सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात अशी वेळ आली होती, जेव्हा तो वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनीच मैदानात खेळायला आला होता. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. 1999 मध्ये सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले आणि तो त्यावेळी इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळत होता. अगोदर संघाने दोन सामने गमावले होते. यानंतर तो भारतात परतला आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर इंग्लंडला परतला आणि केनियाविरुद्ध शतक झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.