Home » क्रीडा » बाबर आझमचा झंझावात; भारताला मागे टाकत पाकिस्तानची ODI रँकिंगमध्ये झेप

बाबर आझमचा झंझावात; भारताला मागे टाकत पाकिस्तानची ODI रँकिंगमध्ये झेप

बाबर-आझमचा-झंझावात;-भारताला-मागे-टाकत-पाकिस्तानची-odi-रँकिंगमध्ये-झेप

नवी दिल्ली, 14 जून : मुलतान येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केल्यानंतर पाकिस्तानने ताज्या एकदिवसीय संघ क्रमवारीत भारताला मागे टाकले आहे. पाकिस्तानने 106 रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे, तर भारत आता 105 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेपूर्वी पाकिस्तान 102 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानावर होता. मुलतानमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने ताज्या MRF टायर्स ICC पुरुष एकदिवसीय संघ क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत शानदार कामगिरी केली आहे. होम ग्रांउडशिवाय इंग्लंड झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. 1998 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानमध्ये पराभूत व्हावे लागले. वेस्ट इंडिजला तर पाकिस्तानने कोणतीही संधी न देता 3-0 ने मालिका जिंकली.

Pakistan 🔼 India 🔽

ICYMI, 🇵🇰 have leapfrogged 🇮🇳 in the @MRFWorldwide ICC Men’s ODI Team Rankings 👀 Details 👉 https://t.co/4KEZKZGaG3 pic.twitter.com/Hd0mjsp74o — ICC (@ICC) June 13, 2022

बाबर आझमच्या कर्णधारपदाखाली पाकिस्तान संघाचा सध्या चढाईचा काळ सुरू आहे. त्याने खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तानला आघाडीवर ठेवले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात झळकावलेल्या शतकासह, तो दोनदा सलग तीन एकदिवसीय शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला, यापूर्वी 2016 मध्येही त्याने अशी कामगिरी केली होती. हे वाचा – VIDEO: श्रीसंतला थप्पड मारल्याचा 14 वर्षानंतर हरभजनला पश्वाताप, म्हणाला… दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील अर्धशतकासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये सलग सर्वाधिक 50+ स्कोअर (9) करण्याचा विश्वविक्रम मोडला. हे वाचा – धोनीच्या त्या निर्णयानंतर निवृत्त होणार होतो, पण सचिनने थांबवलं, सेहवागचा खुलासा भारत सध्या क्रमवारीत पाकिस्तानच्या मागे असला तरी भारताला लवकरच वर जाण्याची संधी असेल. कारण इंग्लंड आणि वेस्ट इंडिज (प्रत्येकी तीन एकदिवसीय सामने) विरुद्ध भारताला खेळायचे आहेत. पाकिस्तानची पुढील एकदिवसीय मालिका ऑगस्टमध्ये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed