Home » क्रीडा » IND vs SA: बॅटिंगनंतर टीम इंडियाची बॉलिंगही फेल, आफ्रिकेचा लागोपाठ दुसरा विजय!

IND vs SA: बॅटिंगनंतर टीम इंडियाची बॉलिंगही फेल, आफ्रिकेचा लागोपाठ दुसरा विजय!

ind-vs-sa:-बॅटिंगनंतर-टीम-इंडियाची-बॉलिंगही-फेल,-आफ्रिकेचा-लागोपाठ-दुसरा-विजय!

कटक, 12 जून : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने (India vs South Africa 2nd T20) विजय मिळवला आहे. भारताने दिलेलं 149 रनचं आव्हान आफ्रिकेने 18.2 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पार केलं. हेनरिच क्लासिनने 46 बॉलमध्ये 81 रनची खेळी केली, यात 7 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. याशिवाय कर्णधार टेम्बा बऊमाने 35 आणि डेव्हिड मिलरने नाबाद 20 रन केले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेलला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताला 20 ओव्हरमध्ये 148/6 पर्यंत मजल मारता आली. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 30 रन केल्यामुळे भारताला या स्कोअरपर्यंत पोहोचता आलं. दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 21 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले तर हर्षल पटेल 9 बॉलमध्ये 12 रनवर नाबाद राहिला. भारताकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 40 रन केले तर इशान किशन 34 रन करून आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिच नॉर्कियाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. याशिवाय रबाडा, पारनेल, प्रिटोरियस आणि केशव महाराज यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. याआधी दिल्लीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला होता, त्यामुळे 5 टी-20 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-0 ने पिछाडीवर आहे. आता सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी टीमला तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे.

Published by:Shreyas

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: South africa, Team india

Leave a Reply

Your email address will not be published.