Home » क्रीडा » IND vs SA : कटकला पोहोचले खेळाडू, पण दुसऱ्या T20 आधी वाढलं टीम इंडियाचं टेन्शन!

IND vs SA : कटकला पोहोचले खेळाडू, पण दुसऱ्या T20 आधी वाढलं टीम इंडियाचं टेन्शन!

ind-vs-sa-:-कटकला-पोहोचले-खेळाडू,-पण-दुसऱ्या-t20-आधी-वाढलं-टीम-इंडियाचं-टेन्शन!

कटक, 10 जून : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या (India vs South Africa 2nd T20) क्रिकेट टीम दुसऱ्या टी-20 मॅचसाठी दिल्लीहून कटकला पोहोचल्या आहेत. 12 जूनला रविवारी हा सामना होणार आहे, त्याआधी शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दोन्ही टीम भुवनेश्वरच्या बीजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्या, इकडे शेकडो क्रिकेट प्रेमींनी त्यांचं स्वागत केलं. याआधी गुरूवारी झालेल्या पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर 7 विकेट राखून रोमांचक विजय मिळवला. कटकच्या बाराबती स्टेडियमचं रेकॉर्डही भारताच्या बाजूने नाही. 5 वर्षांनंतर मॅच टीम इंडिया कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये 5 वर्षांनी मॅच खेळत आहे. याआधी शेवटची मॅच डिसेंबर 2017 साली भारत आणि श्रीलंका यांच्यात झाली होती. या सामन्यात भारताचा 93 रननी दणदणीत विजय झाला होता. भारताने पहिले बॅटिंग करत 3 विकेट गमावून 180 रन केले. केएल राहुल सर्वाधिक 61 रन करून आऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 16 ओव्हरमध्ये 87 रनवर ऑल आऊट झाला. लेग स्पिनर युझवेंद्र चहलने 23 रन देऊन 4 विकेट घेतल्या होत्या, याशिवाय हार्दिक पांड्यालाही 3 विकेट मिळाल्या होत्या. भारताने या मैदानात एकूण 2 टी-20 मॅच खेळल्या आहेत. यातल्या एका सामन्यात त्यांचा विजय झाला तर एकदा त्यांना पराभव पत्करावा लागला. 2015 साली दक्षिण आफ्रिकेनेच या मैदानावर भारताचा पराभव केला होता, त्यामुळे पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकन टीम त्याच विश्वासाने मैदानात उतरेल. त्या सामन्यात भारतीय टीमला पहिले बॅटिंग करत फक्त 92 रन करता आल्या होत्या, 7 खेळाडूंना तर दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी 22-22 रन केले होते. फास्ट बॉलर एल्बी मॉर्कलने 3 तर क्रिस मॉरिस आणि इम्रान ताहीर यांना 2-2 विकेट मिळाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 17.1 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. जेपी ड्युमिनीने नाबाद 30 रन केले होते.

Published by:Shreyas

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: South africa, Team india

Leave a Reply

Your email address will not be published.