Home » क्रीडा » IPL संपल्यावर दिग्गज खेळाडूने घेतली कार, Video शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट!

IPL संपल्यावर दिग्गज खेळाडूने घेतली कार, Video शेअर करत लिहिली इमोशनल पोस्ट!

ipl-संपल्यावर-दिग्गज-खेळाडूने-घेतली-कार,-video-शेअर-करत-लिहिली-इमोशनल-पोस्ट!

मुंबई, 10 जून : आयपीएल (IPL 2022) संपल्यानंतर बरेच खेळाडू स्वत:च्या घरी परतले आहेत, तर काही जण वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. केकेआरचा (KKR) ऑलराऊंडर आणि वेस्ट इंडिजचा विस्फोटक खेळाडू आंद्रे रसेल (Andre Russell) हा सुट्टी एन्जॉय करत आहे. आयपीएल संपवून घरी परतलेल्या रसेलने स्वत:लाच नवी ब्रॅण्ड न्यू कार गिफ्ट केली आहे. याचा व्हिडिओ रसेलने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याचसोबत रसेलने एक इमोशनल पोस्टही शेअर केली आहे, ज्यात त्याने या नव्या कारबद्दल सांगितलं आहे. रसेल आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळला होता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळलेल्या या टीमला प्ले-ऑफमध्ये पोहोचता आलं नव्हतं. आयपीएल संपल्यानंतर आराम करत असलेल्या रसेलने मर्सिडिज-बेंझ एएमजी जीटीआर स्पोर्ट्स कार खरेदी केली आहे. स्वत:लाच गिफ्ट देण्यासाठी रसेलने ही कार विकत घेतली. कारसोबतचा एक व्हिडिओ रसेलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मी कायमच मोठी स्वप्न बघतो. कठोर मेहनत आणि त्याग-समर्पण यामुळे स्वप्न सत्यात उतरतात. देव चांगला आहे, असं रसेल त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. रसेलचं क्रिस गेल, सूर्यकुमार यादव, तबरेज शम्सी, डॅरेन सॅमी यांनी रिप्लाय करून अभिनंदन केलं आहे. तर काहींनी आयपीएलचे पैसे मिळाले का? असा प्रश्नही विचारला आहे. ड्रिंक करून कार चालवू नकोस, असा सल्लाही काही जणांनी रसेलला दिला.

केकेआरने आंद्रे रसेलला 12 कोटी रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. रसेलने या आयपीएलमध्ये 14 मॅच खेळून 12 इनिंगमध्ये 335 रन केले, यात त्याने 32 सिक्स आणि 18 फोर ठोकल्या. याशिवाय बॉलिंगमध्येही रसेलने कमाल केली. केकेआरसाठी या हंगामात रसेलने सर्वाधिक 17 विकेट घेतल्या. एका सामन्यात त्याने 5 रन देऊन 4 विकेटही मिळवल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.