Home » क्रीडा » पाकिस्तानी खेळाडूचा मैदानातच राडा, रन आऊट झाल्यावर बाबरवर भडकला इमाम, VIDEO

पाकिस्तानी खेळाडूचा मैदानातच राडा, रन आऊट झाल्यावर बाबरवर भडकला इमाम, VIDEO

पाकिस्तानी-खेळाडूचा-मैदानातच-राडा,-रन-आऊट-झाल्यावर-बाबरवर-भडकला-इमाम,-video

मुलतान, 10 जून : क्रिकेटच्या मैदानात बरेच वेळा खेळाडूंचा संयम सुटल्याचं आपण बरेच वेळा पाहतो. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज (Pakistan vs West Indies 2nd ODI) यांच्यातल्या दुसऱ्या वनडे मॅचमध्येही असंच झालं. सुरूवातीच्या धक्क्यानंतर इमाम उल हक (Imam Ul Haq) आणि कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांनी चांगली पार्टनरशीप करत पाकिस्तानचा स्कोअर 145 रनपर्यंत पोहोचवला, पण यानंतर इमाम बाबरवर चांगलाच संतापला. 28व्या ओव्हरमध्ये इमाम 93 बॉलमध्ये 77 रनवर खेळत होता, तर बाबरने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं होतं. ओव्हरच्या पाचव्या बॉलला इमामने बॉल कव्हरच्या बाजूने मारला आणि एक रन धावण्याचा प्रयत्न केला. वेस्ट इंडिजच्या फिल्डरने बॉल अडवला, पण तोपर्यंत इमाम नॉन स्ट्रायकरच्या दिशेने धावायला लागला होता. बाबर आझम मात्र रनसाठी धावला नाही आणि त्याने इमामला परत पाठवलं. या सगळ्या गोंधळात वेस्ट इंडिजचा विकेट कीपर शाय होपने इमामला रन आऊट केलं.

Miscommunication results in a run out 💔@ImamUlHaq12 batted well for his 72 ✨#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai pic.twitter.com/x0MVHr0e35

— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 10, 2022

रन आऊट झाल्यानंतर इमाम मैदानातच भडकला आणि त्याने बॅट जमिनीवर जोरात आटली. पॅव्हेलियनमध्ये जात असतानाही इमाम चांगलाच नाराज होता. इमाम आऊट झाल्यानंतर काही वेळाने बाबरही 77 रनवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 275 रन केले. खालच्या क्रमांकावर शादाब खान, खुशीदल शाह, मोहम्मद वसीम आणि शाहीन आफ्रिदीने चांगली बॅटिंग केली. वेस्ट इंडिजकडून अकील हुसैनने 10 ओव्हरमध्ये 52 रन देऊन 3 विकेट मिळवल्या, तर अल्झारी जोसेफ आणि एंडरसन फिलिपला 2-2 विकेट घेण्यात यश आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published.

You may have missed