Home » क्रीडा » भारतीय कॅप्टन ते न्यूझीलंडचा ऑल राऊंडर, पाहा कशी आहे अमेरिकेची Playing 11

भारतीय कॅप्टन ते न्यूझीलंडचा ऑल राऊंडर, पाहा कशी आहे अमेरिकेची Playing 11

भारतीय-कॅप्टन-ते-न्यूझीलंडचा-ऑल-राऊंडर,-पाहा-कशी-आहे-अमेरिकेची-playing-11

मुंबई, 2 जून : क्रीडा क्षेत्रातील महासत्ता असलेली अमेरिका आता क्रिकेटमध्येही मोठ्या तयारीसह उतरली आहे. 2024 साली होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेची (T20 World Cup 2024) अमेरिका संयुक्त यजमान आहे. या वर्ल्ड कपची तयारी अमेरिकेनं सुरू केलीय. त्यासाठी जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील क्रिकेटपटू अमेरिकेत दाखल झाले असून ते आणखी दोन वर्षांनी क्रिकेटच्या मैदानात दिसतील. या खेळाडूंमध्ये टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कॅप्टनपासून ते न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरपर्यंतच्या खेळाडूंचा समावेश आहे. जगभरातील क्रिकेटपटूंची Playing11 अमेरिकन टीमच्या इनिंगची सुरूवात करण्याची जबाबदारी सनी सोहेल आणि भारताच्या अंडर 19 वर्ल्ड कप टीमचा विजेते उन्मुक्त चंद (Unmukt Chand) यांच्यावर असेल. हे दोघंही भारतीय खेळाडू आहेत. त्यांना कधीही टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. तिसऱ्या नंबरवर पाकिस्तानचा समी अस्लम तर चौथ्या क्रमांकावर समीत पटेल हा भारतीय विकेट किपर अमेरिकेच्या प्लेईंग 11 मध्ये असेल. अमेरिकेन क्रिकेट टीमच्या पाचव्या नंबरवर श्रीलंकेच्या शेहान जयसूर्याचा खेळू शकतो. तर न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर कोरे अँडरसन सहाव्या क्रमांकावरून अमेरिकन टीममध्ये खेळणार आहे. सातव्या क्रमांकावर आणि आठव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा इयान हॉलंड आणि ड्वेन पिट खेळतील. त्याचबरोबर जुआन थेरॉन आणि सिद्धर्थ त्रिवेदी ही बॉलिंगमधील पर्याय अमेरिकेकडं आहेत. पंजाबच्या खेळाडूची इंग्लंडमध्ये वादळी खेळी, फक्त 10 बॉलमध्ये काढले 50 रन! VIDEO अमेरिकेची संभाव्य Playing 11 :  सनी सोहल, उन्मुक्त चंद, समी असलम, स्मित पटेल, शेहान जयसूर्या, कोरी एंडरसन, इयान हॉलैंड, डेन पीड्ट, कॅमेरून स्टीवनसन, जुआन थेरॉन आणि सिद्धार्थ त्रिवेदी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

1 thought on “भारतीय कॅप्टन ते न्यूझीलंडचा ऑल राऊंडर, पाहा कशी आहे अमेरिकेची Playing 11

Leave a Reply

Your email address will not be published.