Home » क्रीडा » IPL 2022 : उमरान मलिककडे स्पीड असेल पण… हे काय बोलला शमी?

IPL 2022 : उमरान मलिककडे स्पीड असेल पण… हे काय बोलला शमी?

ipl-2022-:-उमरान-मलिककडे-स्पीड-असेल-पण…-हे-काय-बोलला-शमी?

मोहम्मद शमीने (Mohammad Shami) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) धमाकेदार बॉलिंग केली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात शमी गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) खेळत आहे. मोहम्मद शमी हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगाने प्रभावित झाला आहे.

पुढे वाचा …

 • Maharashtra Maza News
 • Last Updated :

  मुंबई, 13 मे : मोहम्मद शमीने (Mohammad Shami) आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) धमाकेदार बॉलिंग केली आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात शमी गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) खेळत आहे. मोहम्मद शमी हैदराबादचा (SRH) फास्ट बॉलर उमरान मलिकच्या (Umran Malik) वेगाने प्रभावित झाला आहे, पण त्याला मेहनत करण्याची गरज असल्याचं मत शमीने मांडलं आहे. जम्मू-काश्मीरच्या उमरान मलिकने या आयपीएलमध्ये 157 किमी प्रती तासाच्या वेगाने सगळ्यात जलद बॉल टाकला. आयपीएल इतिहासातला हा दुसरा सगळ्यात जलद बॉल आहे. तसंच उमरान आयपीएलमध्ये सगळ्यात जलद बॉल टाकणारा भारतीय बॉलरही ठरला आहे. उमरान मलिकच्या या वेगामुळे अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत, तसंच त्याची ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये निवड व्हावी अशीही मागणी करत आहेत. ‘जलद असणं योग्य आहे, पण जर तुम्ही 140 किमी प्रती तासाच्या वेगाने दोन्ही स्विंग करत असाल तरीही बॅटरला त्रास देऊ शकता. उमरान मलिकला परिपक्व व्हायला आणखी थोडा वेळ लागेल, त्याच्याकडे वेग आहे, पण जास्त खेळल्यानंतर तो गतीसोबतच वेगवेगळ्या गोष्टींबाबतही शिकेल,’ असं शमी म्हणाला. आयपीएलमुळे समोर आलेल्या युवा फास्ट बॉलरना बघून शमी प्रभावित झाला आहे. ‘या मोसमात अनेक युवा फास्ट बॉलर आत्मविश्वासाने बॉलिंग करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. फास्ट बॉलर म्हणून आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी तुम्हाला प्रतिभेसोबतच मॅच प्रॅक्टिसही गरजेची आहे. युवा फास्ट बॉलरना आयपीएलमुळे मॅच प्रॅक्टिस मिळत आहे. ते सीनियर खेळाडूंबसोबत वेळ घालवत आहेत आणि त्यांच्या अनुभवातून शिकत आहेत,’ अशी प्रतिक्रिया शमीने दिली. आयपीएल 2022 मधल्या स्वत:च्या कामगिरीवरही शमी खूश आहे. ‘जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी 100 टक्के द्यायचा प्रयत्न केला, यात मी यशस्वीही झालो. मागच्या 3-4 आयपीएलमध्ये मी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरपैकी एक आहे.’ असं वक्तव्य शमीने केलं. टी-20 क्रिकेटमध्ये कायमच शमीवर प्रश्न उपस्थित केले जातात. त्याला विकेट घेण्यात यश येतं, पण यात तो जास्त रन देतो, असा आक्षेप त्याच्यावर घेतला जातो. मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने 5 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आणि 8.84 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. टी-20 वर्ल्ड कपनंतर शमी टीम इंडियातून बाहेर आहे.

  Published by:Shreyas

  First published:

  मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  Tags: Ipl 2022

  Leave a Reply

  Your email address will not be published.