क्रिकेटमधील ऐतिहासिक निर्णयापासून ते नीरजने फेकलेल्या सुवर्ण भाल्यापर्यंतच्या 2022 मधील क्रीडा विश्वातील सर्व घडामोडी

क्रिकेटमधील-ऐतिहासिक-निर्णयापासून-ते-नीरजने-फेकलेल्या-सुवर्ण-भाल्यापर्यंतच्या-2022-मधील-क्रीडा-विश्वातील-सर्व-घडामोडी

Year End Sport News 2022 : बघता बघता 2022 सालही संपलं, यामध्ये क्रीडा विश्वातही मोठ्या घडामोडी घडल्या. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप नाव कोरलं तर आशिया कप श्रीलंकेने जिंकला. नीरजा चोप्राने फेकलेाल सुवर्ण भाला, बीसीसीआयने महिला क्रिकेटसाठी हे एक ऐतिहासिक निर्णय, जोकोविचवर ऑस्ट्रेलियात येण्यास बंदी, फुटबॉल वर्ल्ड कप फ्रान्सने जिंकला. सर्व घडामोडी एका क्लिकवर (Biggest events in the world of sports 2022 top trending marathi sport news)

ऑस्ट्रेलियातल्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंड नवा चॅम्पियन ठरला. 2010 नंतर इंग्लंडने दुस-यांदा विजेतपदावर आपलं नाव कोरलं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तानमधली मॅच रेकॉर्डब्रेक ठरली. टीव्हीवर 25 कोटी लोकांनी ही मॅच पाहिली.

ऑस्ट्रेलियाच्या 3 दिग्गज क्रिकेटपटूंच्या निधनानं क्रीडा जगतावर शोककळा पसरली. महान स्पिनर शेन वॉर्न, ऑलराऊंडर अँड्य्रू सायमंड्स आणि विकेटकीपर रॉड मार्श यांचं निधन झालं. 

भारतीय सुपरस्टार दीपिका पदुकोणने FIFA विश्वचषक ट्रॉफी लॉन्च केली. अशाप्रकारे ट्रॉफी लाँच करणारी ती पहिली भारतीय ठरली. भारतासाठी हा खास क्षण होता. या ट्रॉफीची केस जागतिक लक्झरी ब्रँड लुई विटॉनने डिझाइन केलेली आणि बनवलेली आहे. दीपिका या लग्झरी ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळे ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी दीपिकाची निवड करण्यात आली. 

ऑल राऊंडर क्रिकेटर हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष गोल्डन इयर ठरलं… आयपीएलमध्ये डेब्यू केलेल्या गुजरात टायटन्स टीमचं नेतृत्व हार्दिककडे देण्यात आलं. हार्दिक पांड्यानेही मिळालेल्या संधीचं सोनं करत टीमला पहिलंवहिलं आयपीएल विजेतपद मिळवून दिलं. त्याचंच बक्षिस म्हणून टीम इंडियाच्या टी-20 टीमची धुराही पांड्याच्या खांद्यावर देण्यात आली. आयर्लंड, न्यूझीलंडनंतर श्रीलंका सीरिजसाठी हार्दिक पांड्याची कॅप्टनपदी निवड करण्यात आली.

कोरोनाने क्रीडा जगतालाही सोडलं नाही.. सर्वात मोठा वाद झाला तो नंबर वन टेनिसपटू आणि ऑस्ट्रेलिया सरकारमध्ये.. कोरोना लस न घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियाने जोकोविचला प्रवेश देण्यास नकार दिला होता. तरीही जोकोविच मेलबर्नमध्ये दाखल झाला. अखेर व्हिसा रद्द करुन 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचची ऑस्ट्रेलियातून हकालपट्टी करण्यात आली. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियात येण्यास तीन वर्षांसाठी बंदीही घालण्यात आली.

रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स या ओपन एरामधल्या दोन दिग्गजांनी टेनिसमधून निवृत्ती घेतली. एका महिन्याच्या अंतराने जन्म, देदीप्यमान टेनिस कारकीर्द, तीन आठवड्यात एकामागोमाग रिटायरमेंट आणि अश्रू ढाळत टेनिस कोर्टला केलेला गुडबाय हा या दोघांमधला समान दुवा होता… फेडरर अर्थात राफाने 20 एकेरी ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम केलाय. तर सेरेना विल्यम्सने आजवर 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदांवर आपलं नाव कोरलंय.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कमाई करणाऱ्या नीरज चोप्रासाठी 2022 वर्षही रेकॉर्डब्रेक ठरलं. जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेत 88.13 मीटरपर्यंत भाला फेकून रौप्य पदक पटकावलं. भालाफेक स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. तर अंजू बॉबी जॉर्जनंतरचा स्पर्धेत पदक पटकावणारा दुसरा भारतीय ठरला तर डायमंड लीग जिंकणाराही तो पहिला भारतीय ठरला. 

फुटबॉल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊटवर पराभव करत अर्जेंटिनाने 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून घेतला. 7 गोल आणि तीन असिस्ट करणारा मेसी अर्जेंटिनासाठी हीरो ठरला. वर्ल्ड चॅम्पियन झाल्याचा जल्लोष अर्जेंटिनाच्या रस्त्यारस्त्यावर साजरा करण्यात आला. 

भारतीय महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याची घोषणा बीसीसीआयने केली… महिला क्रिकेटसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल होतं. पुरुष क्रिकेटर्सइतकंच महिला क्रिकेटर्सनाही टेस्टसाठी 15 लाख, वन डे साठी 6 लाख, टी-20 साठी तीन लाख मिळतील.. भारतीय महिला क्रिकेटर्सनी कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक पटकावलं.. तर लॉर्ड्सवर दीप्ती शर्माने चार्ली डीनची काढलेली मंकडिंग विकेट सर्वाधिक वादाचा विषय ठरली.

बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावलं… 13 वर्षांची मेहनत, एकदा रौप्य तर एकदा कांस्य पदकावर समाधान… आणि अखेर 2022 मध्ये सुवर्ण पदकाचं स्वप्न साकार.. हा सिंधूचा कॉमनवेल्थमधला प्रवास होता. एशिया कपमध्ये मात्र सिंधूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

भारतीय पुरुष बॅडमिंटन टीमने ऐतिहासिक कामगिरी करत 73 वर्षांनी थॉमस कपचं जेतेपद पटकावलं… 14 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या इंडोनेशियाला धुळ चारून सुवर्णकमाई करत भारतानं इतिहास घडवला. लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी भारताच्या विजयाचे शिलेदार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *