क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री;

हार्दिक पांड्याने ‘रॉकी भाई’सोबत खास फोटो शेअर केल्यामुळे चर्चांना उधाण; क्रिकेटर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?
क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; ‘KGF 3’ मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका?
hardik pandya with south indian star yash : रॉकिंग स्टार आणि दाक्षिणात्य अभिनेता यश ‘KGF’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आला. ‘KGF चॅप्टर 2’ सिनेमाने यंदाच्या वर्षी सर्व रेकॉर्ड मोडले. आजही यश आणि यश स्टारर ‘KGF’ सिनेमाची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली आसेत. यशच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही, तर परदेशात देखील फार मोठी आहे. जगभरात यशचे चाहते आहेत. पण अनेक सेलिब्रिटी देखील अभिनेत्याच्या चाहत्यांच्या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा देखील समावेश आहे.
नुकताच क्रिकेटरने केजीएफ स्टार यशसोबत एक खास फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये फक्त यश आणि हार्दिक नसून कृणाल पांड्या देखील दिसत आहे. पांड्या ब्रदर्स केजीएफ स्टार यशचे फार मोठे चाहते आहेत. मोठ्या स्क्रिनवर ‘रॉकी भाई’ म्हणून चाहत्यांच्या भेटीस आलेला अभिनेता नुकताच हार्दिक आणि कृणालला भेटला.
तिघांच्या भेटीचे काही क्षण हार्दिकने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत क्रिकेटरने कॅप्शनमध्ये ‘केजीएफ ३’ असं लिहिलं. हार्दिकच्या कॅप्शनवरून क्रिकेटर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक चाहत्यांनी तिघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
तिघांच्या फोटोवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘अरे भाई साब!’, तर अन्य युजर कमेंट करत म्हणाला, ‘केजीएफ ३ मध्ये खलनायकाची भूमिका साकार, सिनेमाचं कलेक्शन नक्की वाढेल…’ सध्या तीन स्टारचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हार्दिकची सोशल मीडिया पोस्ट आणि चाहत्यांच्या कमेंटवरून असं लक्षात येत आहे, की प्रेक्षक ‘केजीएफ ३’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. पण ‘केजीएफ ३’ बद्दल अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, जानेवारी महिन्यात यशचा वाढदिवस आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात चाहत्यांना आनंदाची बातमी मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.