कोल्हापूर

गारगोटी /कडगाव, पुढारी वृत्तसेवा : भुदरगड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतीसाठी चुरशीने झालेल्या निवडणुकीत स्थनिक आघाड्यांनी विजय मिळवला. या आघाड्यामध्ये राष्ट्रवादीच्या आघाडीचा वरचेष्मा दिसत आहे. या पाठोपाठ भाजप , काँग्रेस, आमदार आबिटकर यांच्या गटाने यश संपादन केले. मुदाळ येथे माजी आमदार के.पी.पाटील तर तिरवडे येथे माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी अनेक वर्षे असलेली सत्ता पुन्हा कायम राखण्यात यश मिळविले.

निकालानंतर तालुक्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी आपल्या गटाचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व जल्लोष करत गुलालाची उधळण केली. मत मोजणीसाठी मौनी विद्यापीठ येथे सात फेऱ्यांमध्ये गावांची मतमोजणी करून दुपारी १२.३० वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यांसाठी १२७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक प्रक्रियेवर निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार आश्विन अडसूळ यांनी काम पाहिले. यावेळी प्रांताधिकारी वसुंधरा बार्वे उपस्थित होत्या.

लक्षवेधी गावे –

मुदाळ – ५० वर्ष एक हाती सत्ता, मुदाळ -५० वर्ष एक हाती सत्ता, कुर -घराणेशाही विरुद्ध सामन्य कार्यकर्ता आकुर्डे -भाजपा विरुद्ध भाजप, शेणगाव – चौरंगी निवडणूक, तिरवडे -माजी आमदार विरुद्ध माजी संचालक, कडगाव मध्ये बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई यांची सत्तेची परंपरा कायम मडीलगे- अपक्ष विरोधी सर्व पक्षीय आशा काही तालुक्यात लक्षवेधी लढती झाल्या.

बिनविरोध ग्रामपंचायत निवड झालेले सरपंच गावनिहाय खालील प्रमाणे

अंतुर्ली – रामदास रघुनाथ देसाई, करडवाडी- विनोद कृष्णा कांबळे, पाल- सुशीला सुधीर गुरव, कोळवण -पाळेवाडी लक्ष्मण बाळू माणगावकर, अनफ खुर्द सरपंच खातूनबी अफजल नाईक, मानवळे – सुरेखा कृष्णात सुतार

गावनिहाय निवडून आलेले लोकनियुक्त सरपंच नावे खालील प्रमाणे

तिरवडे – शुभांगी विश्वजित जाधव, कूर – मदन पांडुरंग पाटील, देऊळवाडी सरपंच- सुनीता रविराज पाटील, मडीलगे खुर्द -कृष्णात आनंदा मांडे, मडिलगे बुद्रुक, -अनुराधा अभिजात देसाई, शेणगाव – सविता देवराज बारदेसकर पुष्पनगर -वैशाली संतोष शिंदे, कोनवडे – सुनीता आबाजी कांबळे, व्हणगुत्ती -विलास रामा केणे, वाघापूर – बापूसो रामचंद्र आरडे, मुदाळ, -राजनंदनी विकास पाटील, टिक्केवाडी – राजेंद्र शंकर पाटील, दारवाड – शामराव गोपाळ मोहिते , पाचवडे – मनोहर महिपती सुतार, भाटिवडे – मीना महेश कांबळे, मिणचे बुद्रुक – छाया पांडुरंग मोरस्कर, पारदेवाडी – संगीता संजय रेडेकर, आकुर्डे, – रवींद्र प्रभाकर पारकर, देवकेवाडी – भिकाजी जयसिंग साळवी, हेदवडे-गिरगाव – राजुभाऊ शिवाजी देसाई, महालवाडी – दयानंद पांडुरंग आरेकर, सोनारवाडी -ऋषिकेश विश्वासराव पाटील, राणेवाडी- स्वाती वैभव राणे, न्हाव्याचीवाडी – नंदा मधुकर पोवार, मडूर, – जयसिंग गणपती सुतार, आरळगुंडी -अनुसया भिकाजी सुतार, दिंडेवाडी -मुकुंद गणपती कांबळे, कडगाव – सुभाष गणपती सोनार, तांबाळे- आना तमास पिंटो, अंतिवडे, -शिलाताई शरद ठाकूर वेसर्डे -लक्ष्मी सुनील शिंदे, देवर्डे – निलम नारायण कोटकर, कारीवडे -अरुण सोमाजी देसाई, शेळोली – अर्चना वाकोजी कांबळे, पडखंबे -लता केरबा पाटील, वेंगरुळ, -प्रशांत बचाराम देसाई, वरपेवाडी सरपंच पद आरक्षित वर्ग नाही – सदस्य पदातून निवडीने उपसरपंच सांभाळणार गावचा कारभार
तालुक्यातील बिनविरोध ५ व ३६ सरपंच पदाच्या निकालानंतर सरपंच पदामध्ये राष्ट्रवादी पक्षाने २३ ,भाजपने १२,काँग्रेसने १० आबीटकर गटाने १६ ठिकाणी सरपंच पद मिळविल्याचा दावा केला आहे.

पोस्टल मतांने तारले

पाचवडे ग्रामपंचायतींमध्ये प्रभाग क्रमांक १मधील उमेदवार वैशाली आनंदा आगम व शितल संजय रानमाळे यांना समान १८६ मते मिळाली होती. त्यानंतर या ग्रामपंचायतीसाठी झालेल्या एका पोस्टल मताने वैशाली आगम विजयी झाल्या.

सदस्य पदात झालेल्या लढतीत समान मते मिळाल्याने चिट्ठीवर निवड

सर्वसाधारण महिला आरक्षित सदस्य पदासाठी पडखंबे प्रभाग १ मध्ये पल्लवी शामराव पाटील व साधना संतोष सरनोबत यांना समान २०३ मते व वर्पेवाडी प्रभाग १ मध्ये पुजा नामदेव वर्पे व अर्चना संदीप वर्पे यांना समान ७१ मध्ये मिळाली होती. या मध्ये चिट्ठी मधून पल्लवी पाटील आणि पुजा वर्पे या विजयी झाल्या

मडूरचे स्टेअरींग जयसिंगच्या हाती

मडूर ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्गातून आरक्षित असलेल्या सरपंच पदासाठी जयसिंग गणपती सुतार हे गारगोटी आगारातून सहा महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेले एस.टी. चालक थेट संरपंच पदावर विराजमान झाले.त

गड आला पण सिहं गेला

काही ग्रामपंचायती मध्ये सदस्य पदात सरशी होऊन ही आशा गटाने लोकनियुक्त सरपंच पद गमावल्याने निराशा झाली यामध्ये कोनवडे येथे,सुनीता कांबळे,देवकेवाडी भिकाजी साळवी यांनी सरपंच पदात बाजी मारून गावचा कारभार एकहाती घेतला

पती हार खाली आणि पत्नी सरपंच पदावर विराजमान झाली

कोनवडे ग्रामपंचायत मध्ये सुनिता कांबळे या सरपंचपदी निवडूण आल्या पण त्यांचे पती आबाजी कांबळे हे सदस्यपदासाठीच्या निवडणूक पराजित झाले.

हेही वाचलंत का?

  • Parbhani Gram Panchayat Election 2022 : जिंतूर-सेलू मतदारसंघात काँग्रेसला पुन्हा उभारी
  • Parbhani Gram Panchayat Election 2022 : जिंतूर,सेलू तालुक्यात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व