कोरोनाबाबत आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचे सूचक विधान म्हणाले

मुंबई, 24 डिसेंबर : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. चीन, अमेरिक आणि दक्षिण कोरीयासारख्या देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने भारताततही चिंत व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रावरही वाढू शकतो या पार्श्वभूमिवर योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रातून कोरोना कधीच गेला आहे. ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा. मात्र येत्या 27 तारखेला कोरोनाची जुनी यंत्रणा होती त्याची मॉकड्रिल होणार असल्याचे ते म्हणाले.
वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमिवर भारत सरकार सतर्क झाले असून, वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांकडून याबाबत एक पत्र राज्यांना पाठवण्यात आलं आहे. आगामी काळात कोणती खबरदारी घेण्यात यावी? याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
हे ही वाचा : आरोग्यमंत्र्यांनी सांगितली राज्यातील कोरोनाची परिस्थिती, नवी नियमावली जाहीर
दरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत मात्र घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत आहेत. ते म्हणाले की, कोरोना महाराष्ट्रातून आऊट झाला आहे. ख्रीसमस आणि नवीन वर्ष धुमधडाक्यात साजरे करा मात्र येत्या 27 तारखेला कोरोनाची जुनी यंत्रणा होती त्याची मॉकड्रिल होणार आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का हे चेक करण्यासाठी आम्ही काही उपाययोजना करणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्र सरकारने जारी केले पत्र
येत्या काळात राज्यात अनेक सणोत्सव आहेत. या काळात कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो, त्यामुळे योग्य ती काळजी घेण्यात यावी असं या पत्रात म्हटलं आहे. ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्ष आढळतील त्याची तातडीने चाचणी करण्यात यावी. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, जसे की हात वेळोवेळी स्वच्छ धुवावेत, आवश्यक त्या ठिकाणी मास्कचा वापर करावा आणि सुरक्षित अंतर ठेवावे अशा अनेक सूचना या पत्राद्वारे राज्यांना देण्यात आल्या आहेत.
सध्या जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता.
हे ही वाचा : Fact Check : खोकला नाही, ताप नाही; ही आहेत नव्या कोरोना विषाणूची लक्षणं?
भाविकांना मास्क घालण्याचं आवाहन
दरम्यान दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक मोठ्या देवस्थानांनी भाविकांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये शिर्डी तसेच त्र्यबकेश्वर यासारख्या देवस्थानांचा समावेश आहे. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी मास्क घालावं व कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.