कोण होतीस अन् काय झालीस! जॅकलिनच्या 'त्या' व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

कोण-होतीस-अन्-काय-झालीस!-जॅकलिनच्या-'त्या'-व्हिडीओवर-नेटकऱ्यांच्या-भन्नाट-कमेंट

मुंबई, o7 डिसेंबर : बॉलिवूडची श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस कायमच चर्चेत असते. नुकतीच तिची महाठग सुकेश प्रकरणात सुटका झाली आहे. आता ती एका दुसऱ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. जॅकलिनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती कॉस्मेटिक सर्जरीबद्दल बोलत असताना दिसत आहे. जॅकलिनचा हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा तिने मिस युनिव्हर्स श्रीलंका स्पर्धा जिंकली होती. बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी जॅकलीनने हे बिरुद आपल्या नावावर केले होते. पण या व्हायरल व्हिडिओमध्ये जॅकलिन ओळखूही येत नाहीये.

या कार्यक्रमादरम्यान प्रश्न-उत्तर फेरीत जॅकलिनला सौंदर्य प्रक्रियेबद्दल विचारण्यात आले. उत्तरात जॅकलिन फर्नांडिस म्हणते, ”होय, कॉस्मेटिक सर्जरी ही एक अयोग्य प्रक्रिया आहे असे मला वाटते. हे सौंदर्य स्पर्धांच्या संपूर्ण संकल्पनेच्या विरुद्ध आहे जे स्त्रियांच्या नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव साजरा करतात. तसेच, जर कॉस्मेटिक सर्जरीला चालना दिली गेली, तर ती कोणाला परवडेल किंवा त्याउलट कॉस्मेटिक सर्जरी कोणाला परवडत नाही हे देखील वादातीत असेल.”

हेही वाचा – Flora saini : ‘त्याने इतकं मारलं की….’ ‘स्त्री’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

पण आता तिने दिलेल्या याच उत्तरामुळे जॅकलिनला नेटकरी ट्रोल करत आहेत. ती या व्हिडिओमध्ये जे सांगतेय त्यापेक्षा अगदी उलट वागली आहे असं नेटकरी म्हणत आहेत. जॅकलिनने स्वतः कॉस्मेटिक सर्जरी केल्याची चर्चा आहे. जॅकलीन पूर्वीपेक्षा आता किती वेगळी दिसते असं अनेक नेटकरी म्हणत आहेत. याचबरोबर ‘तू आतापर्यंत किती वेळा सर्जरी केलीस?’ असं म्हणत जॅकलिन आता ट्रोल होत आहे.

जॅकलिन फर्नांडिसने 2006 मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंका बिझी पेजेंटचा खिताब जिंकला होता. जॅकलिनने 2009 मध्ये ‘अलादीन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने सलमान खान, अक्षय कुमारसह अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. जॅकलिनच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर नुकतंच ती रामसेतू मध्ये झळकली होती. आता येणाऱ्या काळात ती रणवीर सिंग सोबत ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे.

दरम्यान जॅकलीन फर्नांडिस गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणा मुळे चर्चेत आली होती. आता मात्र दिल्ली न्यायालयाकडून तिला दिलासा मिळाला आहे. 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्रीला जामिनासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्यासमोरच्या अडचणी तात्पुरत्या संपल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *