कॉलेजची GS व्हायच्या वयात झाली गावची सरपंच, NCP अन् ठाकरे गटाच्या नुहाचीच चर्चा

:रायगड, 20 डिसेंबर : राज्यातील 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. राज्यात ज्या जिल्ह्यात निवडणुका होत्या त्या जिल्ह्यांच्या ग्रामपंचायतींचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप, शिंदे गटात लढत होताना दिसून आली. दरम्यान रायगड जिल्ह्यातील एका तरुणीला राज्यातील सर्वात कमी वयाची सरपंच म्हणून बहुमान मिळाला आहे. याची जोरदार चर्चा रंगली आहे. नुहा जावेद ढांगु असे या तरूणीचे नाव आहे. ती रायगडमधील वाळवटी ग्रामपंचायतीमधून निवडून आले आहे.
यानिमीत्ताने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत एक सकारात्मक बदल बघायला मिळाला. रायगडमधील वाळवटी ग्रामपंचायतीत 22 वर्षांची मुलगी सरपंच झाली आहे. नुहा जावेद ढांगु नवनिर्वाचित सरपंच असून ती 22 वर्षांची आहे. श्रीवर्धन तालुक्यातील सगळ्यात लहान सरपंच होण्याचा मान तिला मिळाला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे गटांची यांनी एकत्र निवडणुक लढवली. विजयी ठरलेल्या नुहाने आपल्या मतदारांना नाराज करणार नाही आणि त्यांच्यासाठी कम करणार असा निर्धार व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : पहाड खोदला म्हणूनच हे बाहेर आलं.. ठाकरेंकडून थेट CM शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
महाड तालुक्यातील ग्रामीण भागात आमदार भरतशेठ गोगावले यांचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीतील पहिल्या फेरीत 32 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतीत आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने सत्ता मिळवली आहे. दरम्यान रोहा तालुक्यातील पुई, खैरे खुर्द, पहूर या तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी ने जिंकल्या आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीची मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली होती. मतमोजणी आज सुरू झाली असून पहिल्या फेरीत महाड तालुक्यात 32 ग्रामपंचायतींपैकी 11 ग्रामपंचायतींवर आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने वर्चस्व मिळविले आहे. यामध्ये अप्पर तुडील, नांदगाव बु, पारमाची, रानवडी, सवाने, आदीस्ते, वराठी, वारंगी वाघोली, धामणे, कुसगाव, शिरवली, लोअर तुडील, बीजघर, घावरेकोंड, पणदेरी, देशमुख कांबळे, तलीये, कारंजाडी, आडी, उंदेरी तर महाविकास आघाडीकडे आबवडे, वाळसुरे, सावरट, कोथेरी, लाडवली, वरंध, गोठे, मोहप्रे , गांधारपार्ले या ग्रामपचायतींचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीच्या पाठींब्यावर भाजपची सत्ता चिभावे ग्रामपंचायतीवर आली आहे. वरंध ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व गोगावले यांच्या प्रतिष्ठेला धक्का समजले जात आहे.
वाचा – मुख्यमंत्री शिंदेंवर भुखंडाचे श्रीखंड लाटण्याचा आरोप, विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी
माणगाव तालुका 16 पैकी पहिल्या 8 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर
शिरवली – महाविकास आघाडी
व्हावे – महाविकास आघाडी
डोगरोली – राष्ट्रवादी काँग्रेस
नादवी – अपक्ष
कुमशेत – उध्दव ठाकरे गट
दहिवली कोंड – महाविकास आघाडी
पहेल – महाविकास आघाडी
कुंभे – शिंदे गट
भागाड :- महाविकास आघाडी
मागरूल :- शिंदे गट
मुठवली तळे राष्ट्रवादी काँग्रेस
हरकोल:- महाविकास आघाडी
होडगाव :- गावसमिती आघाडी
चिचवली गोरेगाव : महाविकास आघाडी
साई:- राष्ट्रवादी विकास आघाडी
गोरेगाव :- महाविकास आघाडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.