केजरीवालांनी जनतेच्या मनातलं ओळखलं? आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, मतमोजणीत काय स्थिती?

केजरीवालांनी-जनतेच्या-मनातलं-ओळखलं?-आपचे-मुख्यमंत्री-पदाचे-दावेदार-इसुदान-गढवी,-मतमोजणीत-काय-स्थिती?

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर 11 वाजेच्या सुमारास जी आकडेवारी आहे, त्यानुसार, गढवी हे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या पुढे आहेत.

केजरीवालांनी जनतेच्या मनातलं ओळखलं? आपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, मतमोजणीत काय स्थिती?

Image Credit source: social media

अहमदाबादः गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघाचे निकाल काही वेळातच हाती येतील. तत्पुर्वी एका मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. यंदाच्या विधानसभेत आम आदमी पार्टीचीच सत्ता येईल असा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या उमेदवारांकडे…

आम आदमी पार्टीला बहुमत मिळाले तर गुजरातमध्ये इसुदान गढवी हे मुख्यमंत्री असतील, असे संकेत अरविंद केजरीवाल यांनी दिले होते.

गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया मतदार संघातून ते उमेदवारी लढवत आहेत. सुरुवातीच्या कौलांमध्ये इशुदान गढवी आघाडीवर असल्याचे चित्र आहे. गढवी हे व्यवसायाने पत्रकार आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर 11 वाजेच्या सुमारास जी आकडेवारी आहे, त्यानुसार, गढवी हे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराच्या पुढे आहेत.

इसुदान गढवी यांचा जन्म गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील पिपलिया गावचा आहे. त्यांनी सुरुवातीला जाम खभालिया येथून शिक्षण घेतलं. कॉमर्स ग्रॅज्युएट झाल्यानंतर २००५ मध्ये गुजरात विद्यापीठातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं.

गढवी यांनी दूरदर्शनमध्ये काही काळ नोकरी केली. तेथे ते एक कार्यक्रम करत होते. त्यानंतर इसुदान यांनी पोरबंदर येथील एका स्थानिक चॅनलला रिपोर्टिंग केले.

14 जून 2021 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला.

त्यानंतर त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *