किस केलं अन् काही मिनिटात तरुणाचा मृत्यू, अखेर महिलेची तुरुंगात रवानगी

किस-केलं-अन्-काही-मिनिटात-तरुणाचा-मृत्यू,-अखेर-महिलेची-तुरुंगात-रवानगी

किस केलं अन् काही मिनिटात तरुणाचा मृत्यू, अखेर महिलेची तुरुंगात रवानगी

या प्रकारानंतर महिलेची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकारानंतर महिलेची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

या प्रकारानंतर महिलेची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : एक महिला तुरुंगात कैद्याला भेटायला गेली होती. भेटीदरम्यान महिलेने कैद्याला किस केलं. याच्या काहीवेळानंतर कैद्याचा मृत्यू झाला. कैद्याच्या मृत्यूनंतर महिलेवर कैद्याच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलेला अटकही करण्यात आली आहे.

ही घटना अमेरिकेतील आहे. टेनसीच्या तुरुंगात जोशुआ ब्राऊन नावाचा एक कैदी शिक्षा भोगत होता. रेचल डोलार्ड त्याला भेटायला गेली होती. ब्राऊनची भेट घेताना रेचलच्या तोंडात मॅथेंफेटामीन ड्रग्स होता. दोघांनी एकमेकांना किस केलं. यादरम्यान रेचलने आपल्या तोंडातून ड्रग ब्राऊनच्या तोंडात दिलं. यानंतर ब्राऊनने सर्व ड्रग्स एकत्र गिळून घेतले.

महिलेने कुत्र्यासोबत 8 वर्षांपर्यंत ठेवले संबंध; बॉयफ्रेंडनेही दिली साथ, अखेर अटक

ड्रग्सचं वजन साधारण 14 ग्रॅम इतकं होतं. ड्रग्सचा ओव्हर डोसमुळे ब्राऊनचा मृत्यू झाला. कैद्याच्या मृत्यूनंतर टेनसी डिपार्टमेंट ऑफ करेक्शनच्या एजंटने रेचल डोलार्डला ताब्या घेतलं. रेचलवर ड्रग्सची तस्करी आणि कैद्याच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. जोशुन ब्राऊनला ड्रग्सशी संबंधित प्रकरणात दोषी आढळल्यानंतर 11 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2029 मध्ये त्याची शिक्षा संपणार होती.

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags: Crime news, Murder

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *