काहीही झालं तरी बेळगावला जाणारच , धैर्यशील माने भूमिकावर ठाम

“काहीही झालं तरी बेळगावला जाणारच”, धैर्यशील माने भूमिकावर ठाम
प्रदीप कापसे | Edited By: आयेशा सय्यद
Updated on: Dec 19, 2022 | 12:04 PM
काहीही झालं तरी बेळगावला जाणारच….- धैर्यशील माने
पुणे : काहीही झालं तरी मी बेळगावला जाणारच, असं धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी ठामपणे सांगितलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा आज बेळगावमध्ये महामेळावा (Maharashtar Ekikaran Samiti Mahamelava) होणार होता. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने यांना अध्यक्ष म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. धैर्यशील माने यांनी आपण बेळगावला जाणार असल्याचं सांगितलंही होतं. मात्र आता त्यांचा हा बेळगाव दौरा अखेर रद्द झाला आहे. त्यानंतर बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.