कार चालकाने ट्रॅफिक हेडकॉन्स्टेबलला 3 किमी बोनेटवरुन नेले,घटना CCTV मध्ये कैद

कार-चालकाने-ट्रॅफिक-हेडकॉन्स्टेबलला-3-किमी-बोनेटवरुन-नेले,घटना-cctv-मध्ये-कैद

इंदूरमधील सत्यसाई क्रॉसरोडवर ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम सुरु होते. यावेळी एक सफेद रंगाची कार सिग्नलजवळ येताना दिसली.

कार चालकाने ट्रॅफिक हेडकॉन्स्टेबलला 3 किमी बोनेटवरुन नेले,घटना CCTV मध्ये कैद

इंदूरमध्ये ट्रॅफिक पोलिसाला 3 किमी बोनेटवरुन नेले

Image Credit source: social

इंदूर : ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रित करत असतानाच एक धक्कादायक घटना इंदूरमधील सत्यसाई क्रॉसरोडवरील सिग्नलजवळ घडली आहे. वलाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याप्रकरणी ट्रॅफिक पोलिसांनी एका कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालक गाडी थांबवत नव्हता. यावेळी हेडकॉन्स्टेबलने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता कारचालकाने कार कॉन्स्टेबलला धक्का दिला. यात हेडकॉन्स्टेबल कारच्या बोनेटवर आडवा झाला. तरीही कारचालक न थांबत कॉन्स्टेबलला 3 किमी घेऊन गेला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सत्यसाई क्रॉसरोडवर घडली घटना

इंदूरमधील सत्यसाई क्रॉसरोडवर ट्रॅफिक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम सुरु होते. यावेळी एक सफेद रंगाची कार सिग्नलजवळ येताना दिसली. कार चालकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने ट्रॉफिक पोलिसांनी ही कार थांबवण्यचा प्रयत्न केला.

कर्तव्यावर असलेल्या कॉन्स्टेबलला कारने धक्का मारला

मात्र कार चालक ट्रॅफिक पोलिसांचे ऐकायला तयार नव्हता. कार चालकाने गाडी न थांबवता पुढेच चालला होता. यावेळी कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबलने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता कारचालकाने त्याला धक्का मारला. यात हेड कॉन्स्टेबल थेट कारच्या बोनेटवरच आडवा झाला.

हेड कॉन्स्टेबलला 3 किमी बोनेटवरुन नेले

यानंतरही कार चालक थांबायला तयार नव्हता. उलट त्याने कारचा वेग आणखी वाढवला आणि कार पुढेच घेऊन गेला. हेड कॉन्स्टेबलला त्याने सुमारे 3 किमी बोनेटवरुन नेले. ही सर्व घटना सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तीन किलोमीटर गेल्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी पोलिसांनी कार चालकाला रोखले. त्यानंतर हेड कॉन्स्टेबलला खाली उतरवत चालकाला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *