कार्यालयाच्या वादावरून एकमेकांचे बाप काढले ; शिवसेना भवनात येऊन तर दाखवा नेमका इशारा दिला कुणी

कार्यालयाच्या-वादावरून-एकमेकांचे-बाप-काढले-;-शिवसेना-भवनात-येऊन-तर-दाखवा-नेमका-इशारा-दिला-कुणी

शिंदे गटानं नावावरची पट्टी हटवली. त्यानंतर ठाकरे गटाचे समर्थक मुंबई महापालिकेत जमू लागले नंतर महापालिकेतलं पक्ष कार्यालय कुणाचं यावरुन राडा सुरू झाला.

मुंबईः महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीतले दोन कार्यालयं सध्या चर्चेत आली आहेत. मुंबईत पालिकेतल्या शिवसेना कार्यालय वादात नागपूरचं संघ कार्यालयही चर्चेत आलं आहे. या कार्यालयांवरुन ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. खासदार संजय राऊत यांनी थेट शिंदे गटालाच एका बापाचे असाल तर शिवसेना भवनात येऊन दाखवा असा इशाारा दिला आहे. तर प्रसाद लाड यांनी एका बापाचे की दोन बापाचे की तीन बापाचे याचे उत्तर काल झालेल्या राड्याने दिसले आहे असा टोला त्यांना लगावला आहे.

राजधानीपासून ते उपराजधानीपर्यंत शिंदे विरुद्ध ठाकरे गटात संघर्षाची ठिणगी पडली आहे. काल आणि आज मुंबई महापालिकेतलं शिवसेना कार्यालय कुणाचं, यावरुन राडा झाला होता. आणि आता हा वाद शिवसेना भवनापर्यंत पोहोचला आहे.

भाजपचे नितेश राणे आणि शिंदे गटाचे संजय गायकवाड म्हणतात की, जे-जे बाळासाहेब ठाकरे यांचे होतं, त्या-त्या गोष्टीवर शिंदे गटाचा अधिकार असणार आहे तर त्यावरच्या उत्तरांत ही लढाई एकमेकांचे बाप काढण्यापर्यंत गेली आहे.

शिंदे गटाचे राहुल शेवाळे, यशवंत जाधव आणि शीतल म्हात्रे काही कामानिमित्त मुंबई महापालिकेत गेले होते. आयुक्तांच्या भेटीनंतर तिन्ही नेते महापालिकेतल्या शिवसेना कार्यालयात आले. त्यावेळी कार्यालयातल्या फलकावर ठाकरे गटानं यशवंत जाधवा याचं झाकलेलं नाव शिंदे गटाच्या लक्षात आले.

शिंदे गटानं नावावरची पट्टी हटवली. त्यानंतर ठाकरे गटाचे समर्थक मुंबई महापालिकेत जमू लागले नंतर महापालिकेतलं पक्ष कार्यालय कुणाचं यावरुन राडा सुरू झाला.

महापालिकेतलं शिवसेना कार्यालय उभारण्यात आमचाही वाटा आहे, असं शिंदे गटाचे यशवंत जाधव यांनी सांगितले. तर पोलिसांनी मध्यस्ती करुन दोन्ही गटांना यावेळी बाहेर काढलं.

वास्तविक मुंबई महापालिकेत प्रशासक आहे. म्हणजे सध्या नगरसेवक पदावर कुणीही नाही. म्हणून हा वाद पुन्हा उद्भवू नये म्हणून महापालिकेनं सर्वच पक्षांच्या कार्यालयानं कुलूप ठोकलं आहे.

आधी शिवसेनेच्या कार्यालयाला कुलूप लागलं त्यानंतर भाजप, नंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपाचंही कार्यालय सील झालं

मुंबईत पक्षकार्यालयावरुन हा वाद सुरु असताना तिकडे नागपुरात मात्र संघ कार्यालयात शिंदेंच्या भेटीनंही आरोप-प्रत्यारोप झाले

आता हा पक्षकार्यालयाचा वाद शिवसेना भवनापर्यंत गेला आहे शिंदे गटाला शिवसेना भवनही हवं असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. मात्र आमचा शिवसेना भवनावर कोणताही दावा नसल्याचे शिंदे गट सांगतो आहे.

मुंबईत शिवसेनेच्या 482 शाखा आहेत आणि त्या सर्व शाखांचं प्रमुख कार्यालय म्हणजे दादरमधलं शिवसेना भवन आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचं याचा निर्णय कोर्टात आहे.

शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या सर्व शाखा या शिवाई ट्रस्टच्या नावे आहेत आणि त्या शिवाईच्या ट्रस्टींमध्ये म्हणून उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, सुभाष देसाई, अरविंद सावंत, दिवाकर रावते यांच्यासह इतर काही मंडळीही आहेत.

कायदेतज्ज्ञांच्या माहितीनुसार शाखा आणि शिवसेना भवन पक्षाऐवजी ट्रस्टच्या मालकीचं असल्यामुळे त्यावर शिंदे गटाला दावा सांगता येणार नाही. मात्र पक्ष कार्यालय कुणाचं हा वाद चिघळत जाणार असल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *