कार्तिक आर्यन या कारणामुळे 'हेरा फेरी 3' मधून बाहेर? निर्मात्यांचा मोठा खुलासा

मुंबई, 27 डिसेंबर : ‘हेरा फेरी 3’ त्याच्या कास्टिंगमुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या केमिस्ट्रीने एकेकाळी प्रेक्षकांना वेड लावलं होतं. याच चित्रपटाचा पुढचा भाग ‘हेरा फेरी 3’ प्रदर्शनाआधीच चर्चेत आलाय. या चित्रपटाचं चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तिसऱ्या भागातून अक्षय कुमारची एक्झिट आणि त्याचसोबत कार्तिक आर्यनची चित्रपटात एंट्री. अक्षय कुमारची चित्रपटातून एक्झिट झाल्याची बातमी समोर आल्यापासून चित्रपटाच्या चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यानंतर कार्तिक आर्यनला राजुची भूमिका मिळाल्याच्या वृत्ताला अभिनेते परेश रावल यांनी देखील दुजोरा दिला होता. पण आता कार्तिक चित्रपटातून बाहेर असल्याची बातमी येत आहे.
कार्तिक ‘हेरा फेरी 3’ मध्ये सामील झाल्याचं सुरुवातीला रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. यानंतर परेश यांनीही ट्विटरवर एका यूजरच्या प्रश्नाला उत्तर देताना या वृत्ताला दुजोरा दिला. या चित्रपटात अक्षयची जागा कार्तिकने घेतली असल्याची चर्चा यापूर्वी होती. त्यानंतर सुनील शेट्टी यांनी स्पष्ट केले की, या चित्रपटात कार्तिकची भूमिका वेगळी आहे. याचा अक्षयच्या राजूच्या पात्राशी काहीही संबंध नाही. पण आता यातून कार्तिकची देखील एक्झिट झाल्याची बातमी समोर येत आहे.
हेही वाचा – Happy Birthday Salman Khan : भाईजानच्या वाढदिवशी मध्यरात्रीच पोहचला किंग खान; हातात हात घेत अशा दिल्या शुभेच्छा
पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, पेपरवर्क पूर्ण केल्यानंतर कार्तिक आर्यनच्या वागण्यात बदल झाला आणि तो वर्चस्व गाजवू लागला. त्याला शॉट्समध्ये स्वतःनुसार बदल हवा होता आणि बदलाचा आग्रहही होता. त्यामुळे निर्माते आणि कार्तिक यांच्यात वाद निर्माण झाला. रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आता या चित्रपटातून बाहेर पडला आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा सध्या झालेली नाही. याबाबत निर्मात्यांनी किंवा कार्तिकने कोणतीही माहिती दिलेली नाही.
अक्षयला चित्रपटात परत आणण्यासाठी निर्माते प्रयत्नशील आहेत आणि चाहत्यांनाही तेच हवे आहे. एका इव्हेंटमध्ये अक्षय म्हणाला होता, “मला या चित्रपटाची ऑफर आली होती, पण मी त्याच्या पटकथेवर, त्याच्या स्क्रिप्टवर खूश नव्हतो. लोकांना जे पहायचे आहे ते मला करायचे होते, म्हणून मी माघार घेतली. हा चित्रपट माझे जीवन आणि प्रवास आहे. मी स्वत: दुःखी आहे की या चित्रपटात मी नाहीये.” त्यामुळे आता या चित्रपटात अक्षयचीच वापसी होणार का ते पाहणं महत्वाचं ठरेल.
‘हेरा फेरी’ 2000 मध्ये रिलीज झाला होता. त्याचा दुसरा भाग ‘फिर हेरा फेरी’ देखील यशस्वी झाला, जो 2006 मध्ये आला होता. ‘हेरा फेरी’चे दिग्दर्शन प्रियदर्शनने केले होते. या चित्रपटात अक्षय, परेश आणि सुनील दिसले होते. ‘फिर हेरा फेरी’ हा दुसरा भाग दिवंगत नीरज व्होरा यांनी दिग्दर्शित केला होता. यातही अक्षय, सुनील आणि परेश यांची जोडी पाहायला मिळाली. अक्षयने राजू, सुनील शेट्टी यांनी श्याम तर परेश रावल यांनी साकारली बाबुराव या भूमिका अजरामर झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.