कधीही पाहिला नसेल सलमानचा असा अवतार; रिलीज झाला 'किसी का भाई किसी की जान'चा टीझर

कधीही-पाहिला-नसेल-सलमानचा-असा-अवतार;-रिलीज-झाला-'किसी-का-भाई-किसी-की-जान'चा-टीझर

मुंबई, 25 जानेवारी-   बॉलिवूड किंग खान शाहरुखच्या ‘पठाण’ नंतर आता सर्वांना बॉलिवूड भाईजान सलमान खानच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागून आहे. आज चित्रपटगृहांमध्ये पठाण प्रदर्शित झाला आहे.पठाण बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान आता सलमान खानने आपल्या आगामी चित्रपटाचं टीझर रिलीज करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. सलमान खानच्या बहुचर्चित ‘किसी का भाई किसी कि जान’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

सलमान खानच्या चाहत्यांना त्याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागून असते. भाईजानला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. लवकरच सलमान खान आपल्या ‘किसी का भाई किसी कि जान’ या बहुचर्चित चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्कंठा लागून होती. सिनेमा रिलीज होण्यासाठी अजून काही काळ असला तरी आता चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवत आहे.

(हे वाचा: Pathaan: रितेश देशमुखलाही ‘पठाण’चं वेड; शाहरुखच्या सिनेमासाठी केलेलं ते ट्विट चर्चेत)

सलमान खानने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आपल्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. या टीझरमध्ये सलमान खानचा जबरदस्त लुक, धमाकेदार ऍक्शन आणि रोमान्स पाहायला मिळत आहे. टिझरमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेची झलकसुद्धा समोर आली आहे. सलमान आणि पूजा यांची नवी कोरी केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या फ्रेश जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

सलमान खानच्या या चित्रपटाची एक दमदार टॅगलाईनसुद्धा चर्चेत आली आहे. ‘सही का होगा सही… गलत का होगा गलत’. अशी ही टॅगलाईन आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असणार आहे. ‘राधे श्याम’ मध्ये साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत झळकलेल्या पूजाला आता सलमान खानसोबत रोमान्स करताना पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. सोबतच या चित्रपटात भूमिका चावलापासून ते शेहनाज गिलपर्यंत अनेक कलाकार आहेत.

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट या वर्षी ईदच्या शुभ मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सलमान खानने टीझर रिलीज करत चाहत्यांना खुश केलं आहे. अभिनेत्याच्या या इन्स्टा पोस्टला अवघ्या 1 तासात साडे 8 लाखांहुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *