कधीही न पाहिलेलं मकरंद अनासपुरेंचं रुप येणार समोर,नव्या वर्षात TVवर करणार कमबॅक

मुंबई, 30 डिसेंबर : महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना अनेक वर्ष खळखळून हसवणारे सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक आणि सिनेमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तू तू में में या मालिकेनंतर मात्र त्यांनी टेलिव्हिजनपासून ब्रेक घेतला. मात्र नव्या वर्षात मकरंद अनासपुरे यांनी प्रेक्षकांसाठी खास सप्राइज आणलं आहे. मकरंद अनासपुरे टेलिव्हिजनवर पुरनागमन करत आहेत. सोनी मराठी वाहिनी ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मकरंद अनासपुरे महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 5 जानेवारीपासून गुरूवार ते शनिवार रात्री 10 वाजता मालिका सुरू होणार आहे.
‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे पाहायला मिळणार आहेत. दिनकर त्र्यंबक गुळस्कर असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून पोस्ट ऑफिसच्या पार्सल विभागात गेले 17 वर्षं ते कार्यरत आहेत. हे पोस्ट ऑफीस पारगावमधले आहे. मकरंद अनासपुरे यांना पुन्हा मालिकेत पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळी पर्वणी ठरणार आहे. आजवरच्या सिनेमांध्येआपण पाहत आलेला त्यांचा विशेष अंदाज आपल्याला’पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेतून पाहायला मिळेल. हलकी फुलकी कॉमेडी चे निरनिराळे विषय घेऊन ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हेही वाचा – आई कुठे…फेम अनघानं घेतली इतक्या लाखांची कार; नटून थटून केलं स्वप्नातील गाडीचं स्वागत
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या जोडीनीआता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ मालिकेद्वारे ते हास्याचा धमाका घेऊन येत आहेत. ते पहिल्यांदाच एक काल्पनिक मालिका घेऊन आले आहेत.
त्याबरोबरच प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, इशा डे, दत्तू मोरे असे कलाकार या मालिकेत आहेत. प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना एका नवीन भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
 
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.