कजगाव ता भडगाव-प्रतिनिधी संजय महाजन
दि.१ एप्रिल पासुन ४५ वय व त्या पुढील वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू झाल्याने गर्दी वाढू लागली आहे दि.५ एप्रिल पासुन या केंद्रावर दररोज लसीकरण करण्यात येणार असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांनी केले आहे
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत २३ खेडी तर १७ ग्रामपंचायत येतात ७ उपकेंद्र असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेहमीच रूग्णांची गर्दी असते गेल्या महिन्या पासुन काहि प्रमाणात कोरोना ने हाथ पाय पसरवणे सुरू केल्याने कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत काहि पॉझिटिव्ह रुग्ण मिळत आहेत त्या मुळे तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत गेल्या ८ मार्च पासुन या केंद्रावर कोव्हिड लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे सुरुवातीला जेष्ठ नागरिका मध्ये लसी बाबत थोडी घबराट होती मात्र लसीकरण सुरू झाल्या नंतर जेष्ठ नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागल्याने लसीकरणास गर्दी होत आहे त्यातच आता ४५ वय व त्या पुढील वयोगटातील नागरिकांना लसीकरणास परवानगी मिळाल्याने आता लसीकरणास गर्दी होणार आहे
केंद्रावर होत असलेल्या रजिस्ट्रेशन
मुळे जेष्ठ नागरिकांची झाली सोय
ग्रामीण भागात सर्वच नागरिका कडे मोबाईल सेवा नाहि असलं तरी ऑनलाइन ची सोय नसल्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणाला तरी विनंती करावी लागते या साठी कजगाव च्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर एका आरोग्य सेवकांची नियुक्ती करत जेष्ठ नागरिकांचे रजिस्ट्रेशन येथेच होत असल्याने मोठी सोय झाली आहे
कोरोना तपासणी ला लोक येतात
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या २३ खेड्यातील नागरिक लक्षणे जाणवू लागताच कोरोना तपासणी साठी येऊ लागले आहेत त्या साठी या आरोग्यकेंद्रावर आरोग्य कर्मचारी नेहमीच सज्ज रहात आहेत