औसा व्यापारी वर्गात लॉकडाऊनमुळे तिव्र नाराजी.

लातूर

औसा: ज्ञानेश्वर सूर्यवंशी
आज औसा शहरातील विविध व्यापारी वर्गाच्या अध्यक्षांनी युवानेते श्री.अरविंदजी पाटील-निलंगेकर यांची लॉकडाऊन संदर्भात भेट घेऊन लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्ग आर्थिक गर्तेत कशा पध्दतीने सापडला असुन सर्व परिस्थितीचे कथन केले. गेल्या वर्षीपासुन कोरोना महामारीचा पाश्र्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गात मोठी उदासीनता आलेली होती.पण या वर्षी ही उदासीनता दुर होईल,व्यापारात नव्याने उभारी घेता येईल असे वाटत होते. पण परत या महिन्यात राज्य सरकारने कोरानाचे कडक निर्बंध घातले आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच व्यापारी वर्ग मोठ्या आर्थिक गर्तेत सापडल्याचे दिसुन येत आहे.आता शेवटचा पर्याय म्हणून शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी सदोदित आवाज उठवणारे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय संभाजीराव पाटील-निलंगेकर साहेब यांचेकडे सर्व व्यापारी वर्गानी विनंती केली आहे की,सदर निर्बंध शिथिल करण्यासाठी अथवा थोडक्यात बदल करण्यासाठी आपण शासन दरबारी आवाज उठवून तत्काळ सर्व व्यापारी वर्गाला न्याय द्यावा व लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या उपासमारीपासुन आम्हाला वाचवावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. यावेळी युवानेते निलंगेकर यांनी निश्चितपणे आम्ही आपल्या सोबत आहोत आदरणीय भैय्यासाहेब आपल्या व्यथा शासन दरबारी मांडतील त्याआधी आपण अस्वस्थ न होता संयमाने स्वताची काळजी घ्यावी असा सल्लाही यावेळी दिले.
यावेळी औस्याचे माजी नगराध्यक्ष श्री किरणप्पा उटगे,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री सुरेश आप्पा ठेसे ,सुवर्णकार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री सतीश नाईक, कापड व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री. गिरीश आप्पा उटगे, लोखंड भांडी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री रवी अप्पा कवळास, फर्निचर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री संजय भालकिकर, फुटवियर असोसिएशनचे अध्यक्ष श्री गणेश कटके, श्री वसंतराव महामुनी, श्री धनजंय बोकील यांचे सह आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *