मिरज:-संजय पवार
आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी येथील केम हायस्कूल मध्ये सायंकाळी पाच वाजता ओबीसी जनगणना या विषयावर ती प्राध्यापक श्रावण देवरे यांचे व्याख्यान झाले त्यामध्ये त्यांनी ओबीसी मधील सर्व जातींचे जनगणना करणे आवश्यक आहे त्यामुळे पुढील पिढीला ते फायदेशीर ठरणार आहे यासाठी मधील जातीमधील प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आवश्यक आहे येत्या 25 फेब्रुवारीला सांगली येथे ओबीसीचा जनमोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये ओबीसी मध्ये सर्व जातीत मधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा जनमोर्चा क्रांतिकारक झाला पाहिजे आणि आपली ओबीसीची ताकत दाखवून दिली पाहिजे असे परखड मत प्राध्यापक देवरे आणि केले यावेळी त्यांनी याविषयी ओबीसी मधील जाती विषयी पाठीमागचा इतिहास काय आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले त्याची दिशा काय आहे त्यासाठी काय केले पाहिजे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले सदर शिबिराचे आयोजन ओबीसी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री दिनकर पतंगे तसेच ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माळी पांडुरंग वाघमोडे सर तायाप्पा वाघमोडे सर राजेंद्र आरळी तसेच धनाजी गडदे यांनी आयोजन केले होते येत्या 25 तारखेच्या सांगली येथील जनमोर्चा ला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान श्री दिनकर पतंगे यांनी केले
