एरंडोल येथील वीर जवान राहुल लहू पाटील यांच्या वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;पित्यास मुलीने दिला अग्निडाग.

जळगाव राज्य

 

(कार्यकारी संपादक कुंदन बेलदार पाचोरा)

जळगाव जिल्ह्यातील तालुका एरंडोल

येथेआज दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास रामलीला मैदानावर जवान राहुल लहू पाटील यांच्या पार्थिवावर अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम् , देश का वीर कैसा हो राहुल पाटील जैसा हो . अशा घोषणा देत. साश्रुनयनांनी राहुल पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात आला शासकीय इतमामात राहुल पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीमा सुरक्षा दल, महाराष्ट्र पोलीस पथकांनी यावेळी हवेत तीन वेळा गोळ्या झाळून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी खासदार उमेश पाटील, आमदार चिमणराव पाटील, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, एडवोकेट किशोर काळकर, नगराध्यक्ष रमेश परदेशी, अमित पाटील, मनोज पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, छायाताई दाभाडे, जयश्री पाटील, अभिजीत पाटील, प्रतिभाताई पाटील, आरती महाजन , सुरेखा चौधरी,अतुल महाजन, रमेश महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आमले, आनंद दाभाडे, चिंतामण पाटील, मनोज पाटील, नाना भाऊ महाजन, प्रांत अधिकारी विनय गोसावी , डी वाय एस पी राकेश जाधव, मुख्याधिकारी किरण देशमुख प्रभारी तहसीलदार एस.पी. शिरसाट, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, जिल्हा सैनिक कार्यालयाचे अधिकारी रतिलाल महाजन, बीएसएफ चे अधिकारी दिलीप पाटील, बीएसएफ इन्स्पेक्टर इंदोर येथील शिव प्रताप सिंग, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगाव वेल्फेअर ऑफिसर्स अनुरथ वाकडे, यावेळी विविध मान्यवरांनी तर्फे राहुल पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यात आले. तसेच याप्रसंगी अनेक मान्यवरांनी राहुल पाटील यांना श्रद्धांजली वाहिली तसेच राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राहुल पाटील यांचे थोरले बंधू व इतर कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले.
तसेच शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी दिली.
प्रा. वा.ना आंधळे यांनी यावेळी सूत्रसंचालन केले.
दिवांगत राहुल पाटील यांच्या अमृता व काव्या या मुलींनी अग्निडाग दिला.
रविवारी सकाळी इंदौर येथील सीमा सुरक्षा दलाचे पथकाचे वाहन वीर जवान राहुल पाटील याचे पार्थिव घेऊन शहरात दाखल झाले. धरणगाव चौफुली या ठिकाणी वीर जवान राहुल पाटील यांच्या पार्थिवावर उपस्थितांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. व घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानाकडे नेण्यात आले. त्या ठिकाणी परिवारातील सदस्य, नातेवाईक त्यांनी आक्रोश केला, तर गावातील नागरिक व तरुणाईने मोठ्या संख्येने राहुल पाटील यांच्या दर्शनासाठी गर्दी केली.
नंतर देशभक्तीपर गीतांच्या धुन सह अंत्ययात्रा सुरू झाली, अंत्ययात्रेच्या अग्रभागी १५० मीटर लांबीचा राष्ट्रध्वज धरून युवक चालत होते. त्यावेळी प्रत्येक घराच्या समोर वीर जवान राहुल पाटील अमर रहे अशा आशयाचा रांगोळ्या काढल्या होत्या. ११.४५ वाजेच्या सुमारास अंतयात्रा रामलीला मैदानावरील स्मशानभूमीत पोहोचली.
खानदेशी रक्षक संस्था महाराष्ट्र(सर्व आजी माजी सैनिक ग्रुप), तसेच आमदार मंगेश चव्हाण मित्र मंडळाचे युवक व युवती, एरंडोल पोलीस दल, एरंडोल गृहरक्षक दल,नगर परिषद एरंडोल, महावितरण, जय हिंद व्यायाम शाळा मित्र मंडळ, भवानी नगर मित्र मंडळ, गांधीपुरा मित्र मंडळ, हिंदुत्व ग्रुप, यशोदीप चौक मित्र मंडळ
इत्यादी संघटनांचे पदाधिकारी व व कार्यकर्ते यांनी अंत्ययात्रेच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.व अंत्ययात्रेत नागरिकांनी मोठ्या सहभागी घेतला.

राहुल पाटील यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश :

“मलाही राहुल बरोबर चितेत टाका, माझा नातू गेला, आणि मी आता, जगू तरी कशासाठी, माझ्या नातू बरोबर, मलाही त्याच्यासोबत जाऊ द्या . असा आक्रोश राहुलची ८५वर्षे आजी स्मशानभूमीत करीत होती.

राहुलची पत्नी ज्योती पाटील यांचा आक्रोश पाहून कोणालाही रडू येईल असे दिसत होते. पती गेल्यानंतर आता काळोखात मी मुलींचे संगोपन कसे करू असा शोक त्यांनी केला.

भाऊ तू आम्हाला कायमचा सोडून गेला, यापुढे मी तुला पंजाब ला जाण्यासाठी भुसावळ पर्यंत सोडायला कसा जाणार. ज्या ज्या वेळा तू पण पंजाब ला जायला निघायचा. भुसावळ स्टेशनपर्यंत येत होतो. परंतु ती संधी आता मला कधी मिळणार नाही असा शोक राहुल चे थोरले बंधू दीपक पाटील हे करीत होते.

राहुल च्या निधनाने ज्योतीचा जीवनसाथी गेला, आईचा मुलगा गेला, चिमुरड्या मुलींचा पिता गेला, भावाचा भाऊ गेला, देशाचा जवान गेला, भारत मातेचा पुत्र गेला, याची आठवण सर्वांनी कायम ठेवावी अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *