'एपिसोडिक मोबिलिटी'मुळे ब्रिटनच्या महाराणीचा मृत्यू; काय आहे हा आजार?

'एपिसोडिक-मोबिलिटी'मुळे-ब्रिटनच्या-महाराणीचा-मृत्यू;-काय-आहे-हा-आजार?

लंडन, 08 सप्टेंबर : एखाद्याचा आजारपणामळे मृत्यू झाला की त्याची हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार अशीच कारणं असतात. पण ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूचं कारण मात्र वेगळं आहे. वयाच्या 97 व्या वर्षी क्वीन एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे आणि त्यांच्या मृत्यूचं कारण म्हणजे एपिसोडिक मोबिलिटी.

क्वीन एलिझाबेथ यांना एपिसोडिक मोबिलिटीची समस्या होती. एपिसोडक मोबिलिटीबाबत तुम्ही फार कधी ऐकलं नसावं. त्यामुळे नेमका हा आजार आहे तरी काय? त्याची कारणं आणि लक्षणं काय आहेत, हे जाणून घेऊयात.

एपसोडिक मोबिलिटी हा तसा कोणता आजार नाही तर शरीराची एक समस्या आहे. नावानुसारच मोबिलिटी म्हणजे हालचाल आणि एपिसोडिक म्हणजे कधीतरी ज्यात सातत्य नसतं.  एपिसोडिक मोबिलिटवरूनच हालचाल करण्यात समस्या हे स्पष्ट होतं.

जसजसं वय वाढतं तसतसं स्नायू, सांधे आणि हाडांमध्ये समस्या उद्भवते. ज्यामुळे चालण्यात, उठण्याबसण्यात त्रास होतो. जसं की चालताना, खुर्चीवर बसताना आणि उठताना समस्या उद्भवते. काहींना ही समस्या नेहमीची असते. पण काहींना कधीतरी नीट हालचाल करता येते तर कधी नाही. हेच क्वीन एलिझाबेथ यांच्याबाबतीत होत होतं. यालाच एपिसोडिक मोबिलिटी म्हटलं जातं. या समस्येमुळे शारीरिक वेदनाही होतात.

हे वाचा – क्वीन एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर सिंहासन कोणाला? कॅमिलाना मिळणार नाही राणी व्हायचा मान, कारण…

मीडिया रिपोर्टनुसार त्यांना ऑक्टोबर 2021 पासून ही समस्या होती. त्यांची पाठ, हिप आणि गुडघ्यावर परिणाम झाला होता. त्यांना उभं राहायला आणि चालायला त्रास होत होता. यामुळे 60 वर्षांत पहिल्यांदाच त्या मे 2022 च्या स्टेट ओपनिंग ऑफ पार्लिमेंट बैठकीलाही गेल्या नाहीत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

एपिसोडिक मोबिलिटीची कारणे

वाढतं वय

दुखापत

लठ्ठपणा

मानसिक आरोग्याच्या समस्या

न्यूरोलॉजिकल समस्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *